नामाचा मोगरा वाहू सारंग धरा
पुन्हा संसार येणे नाही॥धृ॥
भक्तीची शेवंती वाहू कमलापती
संसाराच्या याती चुकवायला॥१॥
वैराग्य तुळस पांडुरंगा वाहू
वैकुंठाशी जाऊ हरी कृपे॥२॥
वाहू बुद्धी बुक्का करू हरी सखा
काळाचाही धोका मज नाही॥३॥
सुमन पुष्प वाहू सगुण मूर्ती
सार्थ जन्म करू हरी कृपे॥४॥
दासी भामा म्हणे हे ची ध्यानी धरा
पांडुरंग स्मरा वेळावेळा॥५॥
17 окт 2024