Тёмный

वैभवलक्ष्मी व्रताचा एकविसावा शुक्रवार व उद्यापन| संपूर्ण पुजाविधी | पुजेनिमित्त् हरिपाठ भजन 

Udarbharan Nohe
Подписаться 1,6 тыс.
Просмотров 336
50% 1

वैभवलक्ष्मी व्रत तसे साधे सुधे व्रत आहे. परंतु अनेक लोक हे व्रत चुकीच्या पद्धतीने करतात. त्यामुळे त्याचे फळ मिळत नाही. अनेक लोक सांगतात कीं सोन्याच्या दागिण्याची हळद कुंकु लावून पुजा केली कीं ते व्रत झाले. पण तसे नाही. व्रत हे नेहमी विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीनेच केले पाहिजे, तरच त्याचे फळ मिळते. सोन्याच्या दागिण्याची पूजा करूनच जर त्याचे फळ मिळत असते तर सगळेच आज लखपती झाले असते. खरी गोष्ट अशी आहे की सोन्याच्या दागिण्याची विधी पूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली पाहिजे. व्रताचे उद्यापन विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त पद्धतीनेच केले पाहिजे, तरच "वैभवलक्ष्मी व्रता" चे फळ मिळते.
वैभवलक्ष्मीव्रत अकरा किंवा एकवीस शुक्रवार करायचे असते. जितक्या शुक्रवारांचा आपण संकल्प केला असेल तितके शुक्रवार हे व्रत करायचे. व्रताच्या शेवटच्या शुक्रवारी शास्त्रोक्त विधी प्रमाणे व्रताचे उद्यापन करायचे. शेवटच्या शुक्रवारी, दर शुक्रवारी करतो त्याप्रमाणे, पूजाविधी करून नारळ ओवाळायचा पण त्या दिवशी खिरीचाच प्रसाद करायचा त्या नंतर सात कुमारिका किंवा सुवासिनी स्त्रियांना हळद कुंकू लावावे आणि भेट म्हणून वैभवलक्ष्मी व्रताची एक एक पुस्तिका आणि खिरीचा प्रसाद द्यायचा. नंतर धनलक्ष्मी स्वरूप (वैभवलक्ष्मी स्वरूप) माताजींच्या फोटोला वंदन करायचे. लक्ष्मीमातेचे हे स्वरूप वैभव प्रदान करणारे आहे. मातेला वंदन केल्यानंतर मनोमन प्रार्थना करायची की, "हे धनलक्ष्मी माता, मी अंतःकरण पूर्वक वैभवलक्ष्मी व्रत केले आहे. माझे कल्याण कर. माझ्या इच्छा पुर्‍या कर. निर्धनांना धन दे. निःसंतानांना संतान दे. सौभाग्यवतींची सौभाग्य अखंड राहो. कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर. तुझे व्रत करणार्‍यांना सुख परत दे आणि आम्हा सर्वांना सुखी कर."
असे बोलून लक्ष्मीमातेच्या धनलक्ष्मी स्वरूपाला वंदन करून आशीर्वाद घ्यावा.
music in this video - • Aigiri Nandini (Mahisa...

Развлечения

Опубликовано:

 

6 авг 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3   
@aratikulkarni7091
@aratikulkarni7091 Год назад
🙏🙏
@prachimithbavkar6537
@prachimithbavkar6537 Год назад
khup sunder
Далее
It works! #beatbox #tiktok
00:15
Просмотров 7 млн
Хотите поиграть в такую?😄
00:16