कोकण आणि बरेच वाद... छान परंपरा परंतु त्याला गावकी भावकी, देवदेवसकी ,तंटे याचा फायदा पर प्रंतीयानी घेतला आहे. जागे व्हा, नुसतेच vidio ना टाकता त्यातून एकत्र येणाचा message देत जा.प्रबोधन करा
@@suniljpatankar1047 नविन पिढीचे विचार वेगळे आहेत. ते आपल्या परंपरा जपण्याचा प्रयत्न करताना दिसतात ह्या सर्व गोष्टींमध्ये न अडकता. ह्या अशा विडीओ मधून एकत्र येऊन उत्सव कसे पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात आणि आपला वारसा कसा जपला जातो हेच दाखवण्याचा उद्देश आहे. बाकी एकत्र येण्याची गरज तर सर्वच मराठी माणसांना आहे. कमेंट केल्या बद्दल धन्यवाद 🙏🏻😊
@@vinodbhalerao-yz9mo हे तुमचं वैयक्तिक मत आहे. कोकणात गणपती घरोघरी बसतो कारण तो एका अख्ख्या परीवाराचा असतो, जो परीवार मुंबई-पुण्यासारख्या शहरात कामानिमित्ताने राहात असतो. तो स्वतःच्या घरी कधीच गणपती बसवत नाही. कारण त्यांना आपल्या मुळ घरी जाऊन तो साजरा करायचा असतो. परीवारातील सदस्यांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न असतो. ज्याला तुम्ही अंधश्रद्धा म्हणताय त्याला परंपरा जपणं म्हणतात. जे कोकणी माणूस खूप चांगल्या प्रकारे जपतो. जे घरोघरी तुम्हाला अपेक्षित आहे ते मुंबई सारख्या शहरात बघायला मिळतं... ईथे नुसता घरोघरीच नाही तर गल्लोगल्ली गणपती बसवला जातो आणि तुम्ही महाराष्ट्राची गोष्ट करताय ज्याचं आराध्य दैवत गणपती बाप्पा आहे. गावातील प्रत्येक मणूस हा तिथल्या ईकोसिस्टीमचा भाग असतो मग तो कुठल्याही जातीचा असूदे. असो... गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया 🙏🏻
अमित तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवलाय. फक्त एक रिक्वेस्ट आहे की जुन्या जाणत्या माणसांकडून देव आणि देवलयांची माहिती घेऊन परत एकदा व्हिडिओ बनवा. मी सुद्धा शिवडावचाच आहे.