Тёмный

शिस्तप्रिय लेझिम खेळाचा आणखी एक धमाका  

SUDHIR RHATOL.. TOP THE PLAY
Подписаться 1,8 тыс.
Просмотров 27 тыс.
50% 1

वीरनृत्याचाही प्रकारलेझिमीचा खेळ हा पौरुषयुक्त वीरनृत्याचाही प्रकार आहे. त्यात विविध प्रकारचे नर्तकांचे शारीर रचनाबंध आढळून येतात. नर्तकसमूहांनी लेझीम वाजवत गोलाकार फेर धरून नाचणे, वेगवेगळी उलटसुलट वर्तुळे रचीत पुन्हा गिरकी घेऊन पूर्वपदावर येणे, दोना-चारांच्या रांगा करून संचलन करणे इत्यादी. ह्या सर्व हालचालींमध्ये एक प्रकारची सहजता व डौल प्रत्ययास येतो. या समूहनृत्यांत नर्तकांच्या हालचाली व पदन्यास यांचे खूपच वैविध्य दिसून येते. उड्या मारणे, उकिडवे बसणे, वाकणे, पावले तालासुरात मागे पुढे करीत. लयबद्ध रीतीने मागेपुढे सरकणे इ. अनेक नृत्यमय हालचालींचा त्यात समावेश होतो. लेझीम तालासुरात वाजवण्याच्या क्रियेत नर्तकाचे दोन्ही हात गुंतलेले असल्याने, हातांच्या हालचाली नियंत्रित होतात. लेझीम नृत्याची प्रत्येक हालचाल लेझिमीच्या ठेक्याशी व नादलयीशी सुसंगत रीत्या केली जाते. लेझीम नृत्य हलगी, ढोल, झांजा, ताशा या वाद्यांच्या किंवा आधुनिक काळात बॅंडच्या साथीवर केले जाते. सर्व नर्तकांच्या हालचाली तालबद्ध व एकसमयावच्छेदेकरून होत असल्याने त्यात आकर्षकता निर्माण होते. ग्रामीण देवदेवतांच्या पालख्या, गणेशोत्सवासारख्या धार्मिक व सार्वजनिक मिरवणुका, खेड्यातल्या जत्रा, उरूस यांच्यापुढे लेझीम खेळणारे ताफे पाहावयास मिळतात. एक व्यायामप्रकार म्हणून शालेय शारीरिक शिक्षणात त्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

Опубликовано:

 

11 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 10   
Далее
Обыкновенное чудо
00:48
Просмотров 760 тыс.
Amazing Lezim group of Madyal, Kolhapur
4:23
Просмотров 586 тыс.
When Royal Guards Fight Back!
8:08
Просмотров 6 млн