आमच्याकडे ही खीर रामनवमीला करतात.ही गांवजेवण असतें तेव्हां केली जायची.थोडकयात रामनवमी ला केली जायची पण यात खोबरे नसायचे . काहिलीत बनवली जायची .आज तुमची ही रेसिपी पाहून जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
आमच्याकडे म्हणजे माहेरी सांगलीला ही खीर गणपती आणि पक्ष असतो तेंव्हा करतात महाळ असतो तेंव्हा..मला ही खीर खूप खूप आवडते पण खूप वर्षात खाल्ली नाही आता नक्की ट्राय करेन
गहू दोन तास गरम पाण्यात भिजवून ठेवायचे मग कुकर ला शिजवून घ्यायची त्यामुळे खीर मऊ शिजते तुमची खीर नीट शिजली नाही ओला नारळ टाकतात खीर शिजली की वरून सर्व साहित्य टाकावेत तसेच तूप पण
तुम्ही भिजवून घेऊ शकता,७-८ तास भिजवून घ्या असं व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे आणि मागच्या वर्षी मी तशी खीर पण दाखवलेली आहे.. यावेळेस लगेच खीर बनवली म्हणून शिट्ट्या जास्त करून घेतल्या आहेत, आणि खीर नीट शिजली आहे की नाही हे खाल्ल्याशिवाय कसं कळणार... शेवटी तूप पण घातले आहे,आमच्या घरी तरी सर्वांनीच खूप आवडीने ही खीर खाल्ली
खपली गहू जवळपास बंद झाले कारण त्याला पाणी सात-आठ वेळेस द्याव लागत शेतात, आणि पिक ही तेवढे पडत नाही म्हणून लोक करत नाही😂😂 पण फार पौष्टिक चवदार असतात जोड गहू