श्री गजानन महाराजांची आरती | श्री पांडुरंगाची आरती | श्री ज्ञानदेवाची आरती | श्री एकनाथाची आरती | श्री तुकारामाची आरती
#श्रीपांडुरंगाचीआरती
युगें अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।। पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा । चरणी वाहे भीमा उध्दरी जगा ।।१।। जयदेव जयदेव जय पांडुरंगा । रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा । जयदेव जयदेव ।।धृ।। तुळसी माळा गळां कर ठेवूनी कटीं । कासे पितांबर कस्तूरी लल्लाटी । देवसुरवर नित्य येती भेटी ।। गरुड हनुमंत पुढे उभे राहती ।। जयदेव जयदेव ।।२।। आषाढी कार्तिकी भक्त जन येती । साधु जन येती। चंद्रभागेमाजी स्नानें जे करिती दर्शनहेळामात्रे तयां होय मुक्ति । केशवासी नामदेव माधवासी नामदेव, भावें ओंवाळितीं ।। जयदेव जय पांडुरंगा ।।३।।
#श्रीज्ञानदेवाचीआरती
आरती ज्ञानराजा ।। महाकैवल्यतेजा ।। सेविती साधुसंत ।।
मनु वेधला माझा ।। आरती0।।धृ।। लोपलें ज्ञान जगीं ।।
हित नेणती कोणी ।। अवतार पांडुरंग ।। नाम ठेविलें ज्ञानी।।आ।।
प्रकट गुह्ना बोले ।। विश्व ब्रह्नाचि केलें ।।रामा जनार्दनीं ।। पायी टकचि ठेलें ।।
आरती ज्ञानराजा।। महाकैवल्य0।।
#श्रीएकनाथाचीआरती
आरती एकनाथा |
महाराजा समर्था |
त्रिभुवनी तूंचि थोर |
जगदगुरू जगन्नाथा || ध्रु. ||
एकनाथ नाम सार |
वेदशास्त्रांचे गूज |
संसारदु:ख नाम |
महामंत्राचे बीज | आरती || १ ||
एकनाथ नाम घेतां |
सुख वाटले चित्ता |
अनंत गोपाळदासा |
धणी न पुरे गातां |
आरती एकनाथा | महाराजा समर्था || २ ||
#श्रीतुकारामाचीआरती
आरती तुकारामा | स्वामी
सद्गुरुधामा |
सच्चिदानंद मूर्ती | पायी दाखवीं आम्हां || धृ ||
राघवें सागरांत | जैसे पाषाण तारिले |
तैसे हे तुकोबाचे | अभंग उदकीं रक्षिले | आरती || १ ||
तुकितां तुलनेसी | ब्रम्ह तुकासी आलें |
म्हणोनी रामेश्वरें | चरणी मस्तक ठेविलें || आरती तुकारामा || २ ||
#श्रींचीआरती
आरती सद्गुरू नाथा । अवलीया समर्था । आरती ओवाळीतो । मनोभावे मी आता । आरती सद्गुरू नाथा ।।धृ।। दिधले निजभक्ता । भावे इच्छीत फल त्वा, पाजुनि ज्ञानामृता । उध्दरिले समर्था । आरती सद्गुरू नाथा ।।१।। कविजन गुण गाता । थकियले समर्था । अघटित ऐसी लिला । मति धजि ही न आता । आरती सद्गुरू नाथा ।।२।। विनंती भगवंता । तारी रामात्मज आता । आरती पूर्ण करितो । शरणागत बलवंता। आरती सद्गुरू नाथा ।।३।।
Shri Gajanan Maharaj 11.am Aarti with Lyrics
• Shri Gajanan Maharaj 1...
Shri Gajanan Maharaj Morning Aarti with lyrics
• Shri Gajanan Maharaj M...
Shri Gajanan Maharaj Evening Aarti
• “श्रीं” च्या गादी समोर...
8 сен 2024