Тёмный

श्री रामरक्षा (संथा पध्दत) शुद्ध उच्चारांचा अभ्यास करवून घेणारी ध्वनिचित्रफीत 

Pathshala
Подписаться 19 тыс.
Просмотров 1,2 млн
50% 1

CELEBRATING ONE MILLIONS' MILE STONE :
रामरक्षेचे अंतरंग या उपक्रमात श्रीरामरक्षा
ऐका, वाचा, म्हणा व पाठ करा
श्री रामरक्षा(संथा पध्दत) ध्वनिचित्रफीत श्री सद्गुरू कृपाशीर्वादाने रामार्पण
वरील ध्वनिचित्रफितीच्या आधारे आपणास रामरक्षेचे शुध्द उच्चार मुखात बसवता येतील.
निरूपणातून सांगितला जाणारा अर्थ ध्यानात घेऊन
शुध्द उच्चारण व नित्य पठण केल्यास आपल्या मनाच्या संतुलनावर आणि शरीराच्या स्वास्थ्यावर सकारात्मक परिणाम नक्कीच अनुभवता येईल.
नवीन पिढीमध्ये रामरक्षेचा हा संस्कार अवश्य रुजवावा.
आजकलच्या भोगमय वातावरणात त्यांना,
१. त्यागमय आचरणाची सवय लावणारे,
२. संयमाची शिकवण देणारे आणि
३. सदाचाराची गोडी निर्माण करणारे हे सोपे साधन आहे.
आपल्या घरातील व आजुबाजूच्या लहान मुलांकडून ही रामरक्षा अवश्य बसवून घ्यावी. शक्य तितकी रामसेवा करावी.
श्रीरामाने करवून घेतलेली माधुरी रुजविणारी ही सेवा श्रीराम सद्गुरूंच्या चरणी रुजू करताना अतीव आनंद होत आहे.
काही सूचना असल्यास 94 222 74 689 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप द्वारे जरूर कळवावे.
श्रीराम.
तपशील -
ऐका, वाचा, म्हणा आणि पाठ करा श्री रामरक्षा स्तोत्र {संथा पद्धत- प्राथमिक} {अर्धी ओळ} हे रामरक्षा स्तोत्र मला माझे आजोबा वेदशास्त्रसंपन्न कै. मुरलीधरबुवा रामकृष्ण जोशी यांचेकडून ज्या “संथा” पद्धतीने, गुरुमुखातून प्राप्त झाले, तसेच ते देण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी मला सौ. सुवर्णा महाबळ यांचे व अनेक गुणी व गुरुजनांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले आहे. या स्तोत्राचे पठण केल्याने शरीरस्वास्थ्य, मनोबल आणि आत्मसंतुलन प्राप्त होते. सामान्य नियम बसताना शक्यतो आसन घ्यावे. मांडी घालून ताठ बसावे. उच्चार कानांनी व्यवस्थित आणि सावकाश ऐकावेत. म्हणण्याची घाई करू नये. लहान मुलांकडून उच्चार बसवून घ्यावेत. सुवाच्च, सुबक आणि वळणदार हस्ताक्षरासाठी जसे आपण एकेक अक्षर सावकाश गिरवतो तसे नादमय पाठासाठी उच्चार सावकाश गिरवावेत. डौल सांभाळावा. कोकिळेच्या मधुर गायनाने जसे वातावरण प्रसन्न होते तसे रामरक्षा म्हणून आपले मन प्रसन्न व्हायला हवे ना ? मग मनापासून म्हणा ! सुरुवातीचे तीन ओंकार डोळे बंद करून बरोबरीने म्हणावेत. बाहेर विखुरलेले आपले ध्यान त्यामुळे एकाग्र होण्यास मदत होईल. संस्कृत मधील अनुनासिके आणि विसर्ग याकडे विशेष लक्ष द्यावे. ही प्रारंभिक संथा आहे त्यामुळे अर्ध्या ओळीत उच्चार कसे तोडले आहेत याकडे लक्ष द्यावे. पुढील प्रगत भागात संपूर्ण ओळीची संथा असेल. जरी आपल्यासमोर हे दृकश्राव्य माध्यम असले तरी प्रत्यक्ष गुरूकडून संथा घेण्यास पर्याय नाही. आम्हास गुरुमार्गात आमच्या सद्गुरूंच्या मुखातून जे श्रवण अमृतपान करता आले त्याआधारे सद्गुरूंना स्मरून रामरक्षा अर्थाचे निरुपण केले आहे तेही अवश्य ऐकावे. श्रवण चांगले झाले, तर मनन चांगले होईल, मनन चांगले झाले तर चिंतन चांगले होईल, आणि चिंतन चांगले झाले तरच उच्चार शुद्ध होतील. शुद्ध उच्चार केले तर अर्थाकडे ध्यान लागेल, आणि ध्यान लागले तर खरा आनंद मिळेल. श्रीराम.

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,5 тыс.