Тёмный

संवाद : गिरीश कुबेर | बुक ब्रो एपिसोड 81 | डॉ. आशुतोष जावडेकर | Book Bro EP 81  

Ashu's Tunes
Подписаться 4,9 тыс.
Просмотров 11 тыс.
50% 1

ख्यातनाम लेखक, दै. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यासोबत रंगलेला दीर्घ संवाद ताज्या बुक ब्रो एपिसोड 81 मध्ये आहे. लेखक, समीक्षक डॉ. आशुतोष जावडेकर यांनी साधलेल्या या संवादात कुबेर यांनी चीनचं राजकारण आणि अर्थकारण, हरित ऊर्जेच्या मर्यादा, सध्याच्या काळात लेखक असण्याची जोखीम, त्यांचं स्वतःच लेखन आणि त्यासाठी त्यांच्याच शब्दात "स्वतःविषयी निष्ठुर असणं", अग्रलेख लिहीतानाची भूमिका, शास्त्रीय संगीत, लिट फेस्ट, ललित-ललितेतर हा गोंधळ आणि प्राणिप्रेम अशा अनेक विषयांवर दीर्घ, मार्मिक आणि चिंतनशील भाष्य केलं आहे. अवश्य एपिसोड बघून प्रतिक्रिया द्याव्यात ही विनंती.
Like, Share, Comment! Subscribe to Ashu's tunes to watch all Book Bro episodes.
Well known Author and editor of loksatta (  Marathi daily of Indian express group)  mr Girish Kuber speaks his heart and head in this book Bro episode where in Author and Critic Dr Ashutosh Javdekar engage him in a dialogue over several subjects starting from green energy to classical Indian music through his editorial and books! 

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 146   
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 29 дней назад
लोकसत्ता चे संपादक म्हणून त्यांनी मराठीत अर्थ विषयक तज्ञ आणले व त्यांना भरपूर जागा / काॅलम दिले💰. जागतिक साहित्य📚 पुस्तके उजेडात आणली, गाव खेड्यातील सामाजिक संस्थांना व शेकडो होतकरू विद्यार्थी मुलामुलींना शैक्षणिक मार्गात मदत केली... शिवाय ही मदत लोकसहभागातून हे खास🎉
@AshusTunes
@AshusTunes 29 дней назад
व्हिडिओ बघून आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार. चॅनल सबस्क्राईब करून बुक ब्रो व अन्य व्हिडिओ सवडीने बघावे ही विनंती.
@anand6199
@anand6199 Месяц назад
गिरीश जींचे बोलणे इतके सहज संपन्न असते की त्त्यांचे ते बोलणे झाल्यावर कळते कि आपण किती सहजपपणे खूप काही शिकलो आहोत. ह्यादृष्टीने, गिरीश जी सर्वोत्तम शिक्षक आहेत. हसत खेळत गंभीर विषय ते मांडतात आणि आपल्याला विषयाचे गांभीर्य उलगडून जाते. त्यांची पुस्तके, लेख वाचणे, हा अनुभव ज्ञानार्जनाचा विशेष अनुभव वाटतो. त्यांच्या विचारांतून विशेष जाणीवांचा प्रवास घडत जातो आणि खूप मिळाल्याचे समाधान मिळते.
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
व्हिडिओ बघून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करून बुक ब्रो चे अन्य व्हिडिओ सवडीने बघावेत ही विनंती.
@aniketkeni1477
@aniketkeni1477 29 дней назад
गिरीश कुबेर सरांची जवळपास सर्वच पुस्तके वाचून काढली आहेत! अग्रलेखही वाचत असतो. प्रत्येकवेळी ज्ञानात भर पडते. त्यांची व्याख्यानं आणि मुलाखतीही काहीतरी देऊन जातात. धन्यवाद या मुलाखतीसाठी! आणखी काहीवेळ लांबली असती तर नक्कीच आवडली असती..! ❤😊
@AshusTunes
@AshusTunes 5 дней назад
मनःपूर्वक धन्यवाद अनिकेत जी. खरं तर कधीतरी सरांसोबत एखादा मुलाखतीचा लाईव्ह कार्यक्रम करायला हवा!
@aniketkeni1477
@aniketkeni1477 4 дня назад
@@AshusTunes नक्कीच! 👍🏼🙂
@gaurav_dhere
@gaurav_dhere Месяц назад
गिरीश सर आवडते संपादक..
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
वा गौरव
@NamdevKatkar
@NamdevKatkar Месяц назад
आशुतोष सर, छान झाली मुलाखत! ❤
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
व्हिडिओ बघून आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करून बुक ब्रो चे बाकीचे एपिसोड देखील सवडीने बघावे ही विनंती.
@chandsahebmakandar9034
@chandsahebmakandar9034 Месяц назад
आषुतोश मला ही मुलाखत ऐकुन ईतका आनंद झाला कारण त्यांच्या फक्त अग्रलेखासाठी मी लोकसत्ता घेतो याच कारण 40वर्षापुर्वी मी खास माधव गडकर्यांच्या अग्रलेखासाठी आणी ऊत्तम संपादकीयासाठी लोकसत्ता वाचायचो,या मुलाखतीत कुबेरांच व्यक्तीमत्व,विद्वत्ता,बहुश्रुतता,तुसडेपणा ,मांजर,कुत्रा वरील प्रेम ,शास्त्रीय संगीताची आवड हे सर्वच अपुर्वाईच्या गोष्टी ,त्यांच्यावरील निराकरणही कुबेरांनी खुप समर्पक,सुंदर दिलय,त्यांना तुमच्या मुलाखतीतुन ऐकता आल ही मैफल खुपच सुंदर रंगली अस म्हणायला हरकत नाही ,तुमच्या या एपिसोडसाठी खुप शुभेच्छा आणी आभार डौ.
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
मनःपूर्वक धन्यवाद चांद साहेब. तुमची सविस्तर प्रतिक्रिया वाचून मस्त वाटल. तुम्ही व्हिडिओ किती बारकाईने पाहिला आहे याची साक्ष देणारी तुमची प्रतिक्रिया आहे. पुन्हा एकदा धन्यवाद
@sagardesai3551
@sagardesai3551 Месяц назад
गिरीश सरांचे अन्यथा या सदरातील परदेशातील प्रवासवर्णने पुस्तकरूपाने प्रकाशित करावित, विशेषतः युरोप
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
अगदी खरे. अगदी त्या दिवशी आमच्या गप्पांमध्ये शूटिंग नंतर प्रवास होताच. माझे आणि त्यांचे स्पेन मधील अनुभव आम्ही शेअर करत होतो तेव्हा मनात अगदी हेच आल. व्हिडिओ बघून प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून आभार. बुक ब्रो चे अन्य भाग देखील जरूर बघा.
@Dr.Ganesh_Rakh
@Dr.Ganesh_Rakh Месяц назад
डॉ. जावडेकर जी, गिरीश कुबेर सरांना मी तुमच्यासारखाच कैक तास ऐकू शकतो. ह्या मुलाखतीबद्दल खूप धन्यवाद. एक विनंतीवजा सल्ला - तुम्ही गिरीश सरांना त्यांचं पुर्ण वाक्य होण्याआधीच तुमची प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करता. त्यामुळे ऐकणाऱ्याला थोडंसं कानाला बोचत, सातत्य तुटतं. त्यामुळे तुमच्या- आमच्यासाठी जरी ही ' फॅन मोमेंट' असली तरी संबंध मुलाखतीत तुमच्यातील एक मुलाखतकार न दिसता, एक फॅन दिसतं राहतो. त्यांना बोलू द्या, प्रतिक्रिया देण्याची वा त्यांची तारीफ करण्याची घाई करू नका. आणि उपप्रश्र्न विचारा... धन्यवाद 😊
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
@@Dr.Ganesh_Rakh अगदी योग्य सूचना. नक्की ध्यानात ठेवेन पुढच्या संवादात. आवर्जून प्रतिक्रिया दिलीत याबद्दल धन्यवाद. बुक ब्रो चे बाकी भाग देखील जरुर बघा!
@sushmamirashi9357
@sushmamirashi9357 Месяц назад
अप्रतिम मुलाखत
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
Thanks a lot
@suhastaskar9852
@suhastaskar9852 Месяц назад
मी कुबेर सरांचा फॅन आहे. अग्रलेख सकाळी 6 वाजताच वाचून होतो. रविवारी अग्रलेख नसल्यामुळे सकाळी थोडं बोअर होतं
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
व्हिडिओ बघून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करून बुक ब्रो चे बाकीचे एपिसोड देखील सवडीने बघावे ही विनंती.
@dilipchavan6818
@dilipchavan6818 Месяц назад
एखाद्या घटना घडली की आता कुबेर साहेब त्यावर काय लिहीतील, याची मी आतुरतेने वाट बघत असतो. त्यांचे अग्रलेख वाचल्यानंतर मनातले सगळे मळभ दूर होतात.
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
व्हिडिओ बघून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करून बुक ब्रो चे बाकीचे एपिसोड देखील सवडीने बघावे ही विनंती.
@shivajidalvi8770
@shivajidalvi8770 19 дней назад
Read all editorials and many books
@VijayPawar-sz6gq
@VijayPawar-sz6gq 28 дней назад
Girish Sir must start his you tube channel to further educate young minds..
@hrudayanijagtap2597
@hrudayanijagtap2597 Месяц назад
Tumcha agrelekh vachla nahi tar divas sampat nahi
@hrudayanijagtap2597
@hrudayanijagtap2597 Месяц назад
40 min to end interview was amazing
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
व्हिडिओ बघून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करून बुक ब्रो चे बाकीचे एपिसोड देखील सवडीने बघावे ही विनंती.
@rujutakulkarni1968
@rujutakulkarni1968 24 дня назад
मुलाखत देणारे आणि घेणारे दोघंही अभ्यासू वृत्ती वाले असल्याने ऐकायला मजा आली. अनेक जण गिरीश कुबेरांसाठी लोकसत्ता घेतात.. वाचतात, यात सगळं आले. Thanks for this episode
@AshusTunes
@AshusTunes 5 дней назад
मनापासून धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रियेने छान वाटलं
@jayeshpotdar1424
@jayeshpotdar1424 Месяц назад
अपत्रिम भाग. कुबेर सरांना ऐकणं नेहमीच पर्वणी असते. धन्यवाद 🙏
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
धन्यवाद जयेश. व्हिडिओ बघून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करून बुक ब्रो चे बाकीचे एपिसोड देखील सवडीने बघावे ही विनंती.
@jayeshpotdar1424
@jayeshpotdar1424 Месяц назад
@@AshusTunes नक्की सर. धन्यवाद 😊🙏
@pr724
@pr724 Месяц назад
अतिशय अभ्यासपूर्ण आणि अंतर्मुख करायला लावणारी मुलाखत
@AshusTunes
@AshusTunes 29 дней назад
व्हिडिओ बघून आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून आभार. चॅनल सबस्क्राईब करून बुक ब्रो व अन्य व्हिडिओ सवडीने बघावे ही विनंती.
@ramdasthosar1977
@ramdasthosar1977 26 дней назад
its true India (we) should be open for all the energy options, we should not restrict to restrict our progress.
@meenagharpure6833
@meenagharpure6833 27 дней назад
खूप छान झालाय एपिसोड 👌👌 उत्तम प्रश्न व तितकीच सुंदर उत्तरे यामुळे परिपूर्ण झाला आहे. पर्यावरणाविषयी सरांचे विचार वेगळे वाटले पण त्यांनी त्याची दिलेली कारणमीमांसाही पटली. हा एक वेगळा विचार त्यांच्याकडून मिळाला.
@AshusTunes
@AshusTunes 5 дней назад
होय हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मनापासून धन्यवाद मीना मावशी
@bharatikelkar159
@bharatikelkar159 Месяц назад
स्वतःबद्दल निष्ठूर असणे हे वाक्य फारच खरे आहे. खरोखर आवश्यक आहे. त्यामुळेच व्यासंग जोपासना होऊ शकते. या कुबेरांच्या वाक्याने डोक्यात वीज चमकवली आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे आपोआपच मिळाली आहेत. आशुतोष तुम्ही विनाकारण सतत वरच्या पट्टीत बोलत राहता. विशेषतः गिरीश कुबेरांच्या समोर तर हे प्रकर्षाने जाणवले.
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
@@bharatikelkar159 आवाजाचा वॉल्यूम म्हणत असाल तर माईक वेगवेगळ्या अंतरावर गेले हे आहे पण पट्टी आहे ती नैसर्गिकच आहे. कुणाला आवडते , कुणाला नाही 😅 लोक आशयाकडे अधिक लक्ष देतात. कुबेर ते वाक्य तुम्हाला आवडले याचा आनंद. ते त्यांच्या दुसऱ्या कुठल्याही संवादात आलेले नाही आणि माझ्यासोबत बोलताना आले हेही तुम्ही ध्यानात घ्याल 😅🙏 धन्यवाद.
@bharatikelkar159
@bharatikelkar159 Месяц назад
अरे बापरे! उच्च स्वरात बोलता ही माझी टिप्पणी फारच खटकली आहे तुम्हाला. पण तुमच्या आवाजाची पट्टी खटकली याचा अर्थ मी आशयाकडे लक्ष देत नाही असा कसा काढला? उलट आशयाकडे लक्ष देताना आवाजाच्या पट्टीने अडथळा आणला म्हणून ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली असं नाही का? असो.
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
खटकली नाही उलट मी खरं उत्तर दिलं. गैरसमज नसावा 🙏 बुक ब्रो चे अन्य भाग अवश्य बघा. सूचनांचे कायम स्वागत
@cradlematernity
@cradlematernity Месяц назад
धन्यवाद. या मुलाखतीच्या निमित्ताने कुबेर सरांची भेट घडली. मला ठाऊक आहे की कुबेर सरांना हे आवडणार नाही पण गेली काही वर्षे मी त्यांच्या लेखनाचा "भक्त" आहे 😊. लोकसत्तात छापून आलेला सरांचा शब्द नी शब्द मला पेपर हाती पडल्या पडल्या वाचायलाच लागतो. आणि मला हे आवडत नाही पण त्यांची सर्व मतं मला सहजच पटतात 😊.
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
व्हिडिओ बघून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करून बुक ब्रो चे बाकीचे एपिसोड देखील सवडीने बघावे ही विनंती. आणि हो तुमची प्रतिक्रिया मी मुद्दाम कुबेर सरांना फॉरवर्ड केली😊
@amitpawar-k3r
@amitpawar-k3r Месяц назад
गिरीश सरांचे लिखाण आवडते.तुमचेही लोकसत्तामध्ये लेख वाचले आहेत.मुलाखतीत अजून काही महत्त्वाचे मुद्दे हवे होते.पण एकंदरीत छान झालीय.
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
धन्यवाद अमितजी. तुम्ही आवर्जून प्रतिक्रिया व्हिडिओ बघून दिले याबद्दल आभार. बुक ब्रो मध्ये राजकारण हा फोकस नसून पुस्तके आणि लेखक हा असल्याने मुलाखत त्या अनुषंगाने आहे. परंतु अजून कुठले मुद्दे तुम्हाला सुचले तर इथे सांगून ठेवा कारण कधी जर लाईव्ह मुलाखत घेतली तर त्याचा उपयोग होईल. चॅनल सबस्क्राईब करून उर्वरित एपिसोड देखील सवडीने बघावेत ही विनंती
@suhastaskar9852
@suhastaskar9852 Месяц назад
मी 1992 पासून लोकसत्ता नियमितपणे वाचतो.
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
व्हिडिओ बघून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करून बुक ब्रो चे बाकीचे एपिसोड देखील सवडीने बघावे ही विनंती.
@vasudhadamle4293
@vasudhadamle4293 Месяц назад
मी कुबेर सरांचे अग्रलेख नेहमी वाचते व मला खूप आवडतात. ही मुलाखत छान झाली, सरांच्या प्राणी प्रेमाबद्दल नव्याने माहिती झाली.
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
वसुधा जी, व्हिडिओ बघून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करून बुक ब्रो चे बाकीचे एपिसोड देखील सवडीने बघावे ही विनंती.
@ajit.........5430
@ajit.........5430 29 дней назад
अप्रतिम मुलाखत..खूप छान .पण अजून 1 तास पाहिजे होती ...कुबेर सरांना तुम्ही छान बोलत केलत ..खूप छान👌👌👌👌
@AshusTunes
@AshusTunes 5 дней назад
मनःपूर्वक धन्यवाद अजित जी
@anjalimulay6613
@anjalimulay6613 Месяц назад
सरांची मुलाखत म्हणजे बौद्धिक मेजवानी आहे.त्यांचं कौतुक करण्याची माझी योग्यता नाही.पण त्यांचा रोजचा अग्रलेख वाचल्याशिवाय चहाची मजा येत नाही.अग्रलेखाचं पूर्ण पानच वाचनीय आणि एखादा विषय पूर्ण उलगडून सांगणारं असतं .त्यांची जवळपास सगळी पुस्तकं मी वाचली आहेत .क्लिष्ट , अभ्यासपूर्ण विषयही मनोरंजक पद्धतीने कसा मांडावा हे त्यांच्याकडून शिकावं. आजच्या राजकारणाची चर्चा करताना वाद घालण्यापेक्षा अनेकांना मी लोकसत्ताचे अग्रलेख वाचायला सांगते.या अग्रलेखांच्या छोट्या पुस्तिका तयार करून वाटल्या तर आपला समाज राजकीय दृष्ट्या प्रगल्भ होईल असा विचार मनात येतो . त्यांची प्रवासवर्णनंही मला खूप आवडतात आणि ती आपल्याला एखाद्या शहराच्या अंतरंगात शिरून एक वेगळी ओळख करून देतात. मुलाखतीचा शेवट ह्रद्य झाला आहे. डॉक्टर,इतकी सुंदर मुलाखत आमच्यापर्यंत पोचवलीत त्यासाठी तुमचे आभार !
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
अशा सविस्तर प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार अंजली ताई. कुबेर सरांना ही मी प्रतिक्रिया फॉरवर्ड करतो. मनापासून धन्यवाद
@yogitabhirud9316
@yogitabhirud9316 21 день назад
खूप छान ऐकायला मिळाले माझे आवडते लेखक
@AshusTunes
@AshusTunes 5 дней назад
धन्यवाद योगिता जी. बुक ब्रोचे अन्य भाग देखील आवर्जून बघा
@KiranKulkarni-jd2in
@KiranKulkarni-jd2in 29 дней назад
Hawa hawasa watanara tusdepana
@AshusTunes
@AshusTunes 29 дней назад
व्हिडिओ बघून आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार. चॅनल सबस्क्राईब करून बुक ब्रो व अन्य व्हिडिओ सवडीने बघावे ही विनंती.
@thekiminthenorth504
@thekiminthenorth504 12 дней назад
असंतांचे संत मागे घेणारा पत्रकार
@vishwajeetbotve2506
@vishwajeetbotve2506 Месяц назад
चीन, रशिया वरती लिहीले त्या दर्जाचे गिरीश कुबेरांनी भारतावरही लिहावे.
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
व्हिडिओ बघून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करून बुक ब्रो चे बाकीचे एपिसोड देखील सवडीने बघावे ही विनंती.
@nitinkulkarni631
@nitinkulkarni631 Месяц назад
कॉपी पेस्ट म्हणजे कुबेर, उद्या ते हिब्रू मध्ये ही लिहू शकतील😅
@mahendraparchure9607
@mahendraparchure9607 Месяц назад
मी पूर्वी गोविंद तळवलकरांच लेखन वाचायचो.आता गिरीश कुबेर यांचं वाचतो.पण मनापासून म्हणावसं वाटतं की गिरीश हे तळवलकरांचे खरे शिष्य आहेत.
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
या मुलाखतीमध्ये मला वाटतं तो धागा अधिक सगळ्यांपुढे स्पष्ट झाला. व्हिडिओ बघून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करून बुक ब्रो चे बाकीचे एपिसोड देखील सवडीने बघावे ही विनंती.
@chandrakantsutar6290
@chandrakantsutar6290 Месяц назад
कुबेर सर म्हणजे ऊर्जा या विषयावर चे वास्तव सादर करणारा एकमेव ऊर्जावान लेखक.
@anirudhayerunkar2393
@anirudhayerunkar2393 Месяц назад
My most favorite writer. Never imagined you would call him. Best episode ever in Ashu's tune❤❤❤🎉🎉🎉🎉 I left my 11 years career in MNC, one of the best bank in the world, only after reading his books, articles daily and joined journalism.
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
Many thanks dear Anirudha! Good to know your own unique life journey
@anirudhayerunkar2393
@anirudhayerunkar2393 Месяц назад
@@AshusTunes Thanks sir.
@parimaldhawalekar7150
@parimaldhawalekar7150 Месяц назад
डॉक्टर, छान उलगडलंत कुबेरांना. या माणसाचा व्यासंग कमाल आहे. माध्यमात काम करणारी अशी माणसं एका पिढीत एकच अशा मापानंच निर्माण होतात. करकरीत बुद्धी, उत्तम शब्दकळा, मांडणी या सर्वच बाबतीत गिरीश सर उजवे आहेत. या माणसाने स्वतःला घडवलं आहे. 2010 अगोदरचे कुबेर मराठी लोकांना फारसे माहीत नाहीत. आपल्या देशाचा पेट्रोलियम मंत्री कुबेरांच्या तेलाच्या राजकारणावर केलेल्या टिपण्णीचा आधार घ्यायचा, ही बाब मराठी लोकांच्या ध्यानात न येणारी आहे. असो पण,तू फार छान मुलाखत घेतलीस ! तुझ्या चॅनलवर कुबेरांना बोलवावंस ही मागणी पुरी केलीस त्याबद्दल आभार !
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
मनापासून धन्यवाद परिमल. तुझी प्रतिक्रिया इतकी रेखीव शब्दांनी युक्त आहे की मी दोन-तीन वेळा वाचली. आणि अर्थात गिरीश सरांना फॉरवर्ड केली. तू म्हणतोस ते अगदी खरं. राजकीय विचारधारा जमत नाही म्हणून लोकं फुल्या मारत जातात. आपल्याला सगळं पटलेलं नसेल तरीही जे पटतं ते कधीकधी अधिक अर्थपूर्ण आणि महत्त्वाचं असतं याचा समाज माणसाला विसर पडत चालला आहे. खेरीज आता कुबेर सरांची इंग्रजी मध्ये पुस्तके इंग्रजीत आल्याने त्यांचे हळूहळू देशभर आणि परदेशात अधिक नाव होऊ लागले आहे याचाही काहींना त्रास होत असावा! असो. तू इतकी सुंदर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार. तुझा मित्रमंडळींमध्ये व्हिडिओ अवश्य शेअर करावा ही विनंती
@harshadajoshi3841
@harshadajoshi3841 Месяц назад
अगदी खरं! समोरच्याचं मत पटत नसलं तरीही आधी ते शांतपणे ऐकून घेणं आणि मग ते मुद्देसूदपणे खोडून काढणं ही आपली प्राचीन वादपरंपरा आहे. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्येही ही अशी मतमतांतरं अगदी सहजपणे नमूद केलेली आढळतात. आणि मग आपलं काही वेगळं मत असेल तर ते मांडलं जातं. पण हल्ली आपण फुल्या मारण्यात फारच तरबेज झालोय. मग त्या माणसाचा व्यासंग काय आहे, अभ्यास किती आहे या गोष्टी अलाहिदा ठरतात. व्यक्तिश: मला कुबेरांचं लेखन आवडतं. त्यांचा अभ्यास त्यांच्या लेखनातून दिसतो. मला वाटतं हे इतकं जरी (अभ्यासोनि प्रकटावे!) आपण अंगी बाणवू शकलो तरी आपला दृष्टीकोण विस्तृत होऊ शकतो.
@rahulaphale
@rahulaphale Месяц назад
मुलाखत फारच आवडली पण लवकर संपली अशी हुरहुर लागली. सजग, नाविन्यपुर्ण आणि अभ्यासू ही निष्ठूरपणा आणि तुसडेपणा सोबतची बिरूदावली..खरतर “ तेल “ नावाच वेगळच दालन उघडणारा असा हा मुशाफिर लेखक… किशोरीताईंची घेतलेली मुलाखत ही त्यांच्या शास्त्रीय संगीताचा अभ्यासक/ रसिक असणारा अजून एक पैलू…इथेनॉल, सौरऊर्जा अशा विषयावर ते तर्कसंगत लिहून ते त्याची मर्यादा सिध्द करतात आणि कठोर वास्तवाची जाणीव करून देतात ..आशिया युरोप अमेरिका वेगळ्या नजरेने पहातात आणि …तिथल्या लोकांची उद्यमशीलता, रसिकता, नेमकेपणा , व्यक्तिस्वातंत्र्य , लोकशाही अशी चतूरस्त्र मांडणी करतात. मुलाखत बंदीस्त न होता मुक्त होती हे आवडल. त्यांची दिनचर्या असा सुंदर प्रश्न मात्र अर्धउत्तरीत्तच राहिला असं वाटल. Thank you Ashutosh !
@shubhangidhuru2053
@shubhangidhuru2053 Месяц назад
Listening to Girish Kuber sir is always very enriching
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
Thank you for watching the episode. Kindly subscribe the channel and give try to another episodes as well
@sohaminamdar8405
@sohaminamdar8405 Месяц назад
अतीशय अभ्यास पूरवर्क मुलाखत ! गिरीश सर अनुभवी व अभ्यासू बोलतात !❤ ऐकायला जाम मजा आली !
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
खूप खूप धन्यवाद सौरभ! बुक ब्रो चेअन्य एपिसोड देखील अवश्य बघ 💗🙏
@rajendramuley5838
@rajendramuley5838 Месяц назад
अभ्यासू आणि अत्यंत मुद्देसूद मांडणी.एक ऊत्कृष्ट मुलाखतवजा मैफलच.फक्त लवकर संपल्याची रूखरूख वाटली.लवकरच आणखी एखाद्या पूस्तकावर अशीच मुलाखत ऐकायला आवडेल.
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
तुम्हाला एपिसोड मैफिली सारखा वाटला याचा मनापासून आनंद झाला. खूप खूप धन्यवाद. चॅनल अवश्य सबस्क्राईब करून बाकीचे व्हिडिओ सवडीने बघावेत हे विनंती
@snehaketkar8571
@snehaketkar8571 Месяц назад
कुबेर हे प्रतिक्रिया देऊ नका असे म्हणतात, पण त्यांचे बरेचसे लेखन प्रतिक्रियात्मकच असते असे वाटते.......
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
मतमतांतरे... प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. बुक ब्रोचे अन्य एपिसोड देखील अवश्य बघावेत ही विनंती
@sudhanshuchousalkar5212
@sudhanshuchousalkar5212 Месяц назад
Very nice interview. I have few books of Mr. Kuber. I regularly read his editorials. We coulf]d get to know about his love for animals. Thanks for the interview.
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
Many thanks for watching the video and responding. Yes, to have someone like Mr Kuber in this series is a great honour and pleasure for everyone. Please do subscribe and watch other episodes of book bro as well.
@suvarnashikare9593
@suvarnashikare9593 Месяц назад
Listening to both of you, have A Great Lesson!!! Amazing Episode!!
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
How delightful to read! Many thanks dear Suvarna madam 💗
@sandyandy100
@sandyandy100 Месяц назад
मी फॅन आहे कुबेर सरांचा जबरदस्त झालाय एपिसोड
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
खूप खूप धन्यवाद अनिरुद्ध
@swapniljoshi543
@swapniljoshi543 Месяц назад
Much needed interview sir ❤🎉
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
Many thanks
@bharatilimaye6083
@bharatilimaye6083 Месяц назад
गिरीशजींना विनंती की काही पुस्तके, आपली audio books मधे उपलब्ध करावी ही विनंती
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
@@bharatilimaye6083 यायला हवीत
@atulmukne3177
@atulmukne3177 Месяц назад
एक अप्रतिम मुलाखत. कुबेर सरांची मुलाखत ही वाचकांना मोठी पर्वणी असते. आजच्या काळातील एक सर्वगुणसंपन्न संपादक आणि लेखक आहेत.
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
खूप खूप धन्यवाद अतुल जी. चॅनल सबस्क्राईब करून बुक ब्रो चे बाकीचे एपिसोड देखील सवडीने बघावे ही विनंती.
@rohankulkarni100
@rohankulkarni100 Месяц назад
अतिशय उत्तम मुलाखत.. मी एका तेलियाने आणि adharmyudh वाचलं आहे..कुबेर सरांच लिखाण हे लालित्यपूर्ण माहितीपर असतं..made in chaina chi उत्सुकतेने वाट बघतोय
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
धन्यवाद रोहन जी. मलादेखील त्यांची पुस्तके व्यक्तिशः त्यांच्या वर्तमानपत्रातील लेखापेक्षा अधिक आवडतात! मेड इन चायना अवश्य वाचा. व्हिडिओ बघून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करून बुक ब्रो चे बाकीचे एपिसोड देखील सवडीने बघावे ही विनंती.
@tufan_bebhan
@tufan_bebhan Месяц назад
आशुतोष सर खूप छान मुलाखत झाली, मुलाखत कधी संपली हेच कळले नाही..किती नवीन शब्द regal aloofness,intertextuality शिकायला मिळाले. कुबेर सरांचा संगीत, आंतरराष्ट्रीय राजकारण , समाजकारण इत्यादी व्यासंग पाहून मराठी पत्रकारिता (वृत्तपत्रे फक्त) अजून शाबूत आहे असं वाटतं ..बाकी मराठी राजकारण संवेदनशीलता संपवण्यात व्यस्त आहे तर मराठी tv news channel मधील पत्रकारिता संपल्यातच जमा आहे...म्हणून शा मुलाखती एक वेगळा आशावाद देतात
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
मनःपूर्वक धन्यवाद. ❤ तुमची प्रतिक्रिया वाचून मस्त वाटलं. आणि विशेषतः तुम्ही नवे शब्द अचूक टिपलेत याचा आनंद झाला! तुम्ही सरांविषयी लिहिलं आहे ते खरंच आहे...
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
मनापासून धन्यवाद. तुम्ही बारकाईने व्हिडिओ बघितला आहे याची साक्ष देणारी ही प्रतिक्रिया आहे. बाकी मराठी टीव्ही चॅनल विषयी तुम्ही जे मत मांडले तेच मलाही वाटते! चॅनल सबस्क्राईब करून अन्य व्हिडिओ सवडीने बघावेत ही विनंती
@vilasjoshi5739
@vilasjoshi5739 Месяц назад
मुलाखत अर्थातच उत्तम! गिरीश कुबेर सरांचा मी चाहता आहे. फक्त त्यांचे "संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास लिहीला गेला नाही" हे विधान बहुतेक दुरूस्त करावे लागेल कारण लालजी पेंडसे यांनी "महाराष्ट्राचे महामंथन" या पुस्तकातून तो इतिहास मांडला आहे.
@AshusTunes
@AshusTunes 28 дней назад
@@vilasjoshi5739धन्यवाद विलास जी . तुमची पुरक माहिती मोलाची आहे
@Ramesh.7GP
@Ramesh.7GP Месяц назад
मुलाखत आवडली. दोन भाग हवे होते.
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
धन्यवाद रमेश जी. बुक ब्रो चे अन्य भाग देखील अवश्य बघा 🙏
@Kaustubh56
@Kaustubh56 Месяц назад
छान मुलाखत आहे! Subscribed... डॅा. जावडेकर - तुमचे लोकसत्ता मधील लेखही मी नियमीतपणे वाचतो.
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
कौस्तुभ जी, आपले खूप खूप मनापासून आभार. हा व्हिडिओ आवर्जून तुम्ही बघितलातआणि माझे लेखही तुम्ही वाचता याचा आनंद झाला. चॅनल सबस्क्राईब करून उर्वरित एपिसोड सवडीने अवश्य बघावेत ही विनंती
@neelimaborwankar5618
@neelimaborwankar5618 Месяц назад
गिरिश कुबेर सरांचा व्यासंग त्यांच्या पुस्तकातून, पुरवणीतल्या लेखातून जाणवतो. त्यांचं पुस्तकांविषयी सदर वाचत असताना आपण किती अल्प वाचलंय हे लख्ख लक्षात आलं होतं. फिरताना ते जे टिपतात तेही आपल्याला नवी दृष्टी देतं. आशुतोष तुझंही युरोपात फिरतानाच्या अनुभवांचं लेखन मस्तच. लोकसत्तेत प्राणीप्रेमी असं एक सदर होतं त्यात कुबेर सरांनी त्यांच्या या प्रेमाविषयी सविस्तर लिहिलं होतं. ते स्वत:चं वर्णन तुसडा असं करत असले तरी लेखनशैलीतून तसं प्रतिबिंबित होत नाही. एपिसोड एकदम भारीच
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून आभार नीलिमा ताई. तुमचं निरीक्षण मार्मिक आहे. किंबहुना मला वाटतं की भारतीय गळे पडू पद्धतीनुसार ते वागत नसल्याने त्यांच्यावर तुसडा असा शिक्का बसला असावा आणि मग त्यांनीही तो एकंदर समाज मानस बघता वेगळ्या पद्धतीने उपयोगात आणला!!
@ajaykulk
@ajaykulk Месяц назад
अप्रतिम मुलाखत आशू. मी कुबेराच्या प्रशंसक नाहीये. पण ते खूप अभ्यासू आहेत यात वाद नाही. खूप महत्वाचे मुद्दे मांडले त्यांनी. पण त्याचा डावीकडचा कल कुठेतरी डोकावतो.
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
@@ajaykulk धन्यवाद 🌸🙏 विचारसरणी हा एक भाग. या मुलाखतीत त्यांनी अनेक बाकी महत्त्वाचे मुद्दे मांडले. ते डावे आहेतच पण when he spoke on green energy his views were way divergent from traditional leftist environmentalists.
@SmitinBrid
@SmitinBrid Месяц назад
ही एक चांगली मुलाखत आहे. स्वतःबद्दल निष्ठूर असणे - हे विलक्षण वर्णन आहे. ह्या वाक्यात मी मला सापडलो !!
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
मनःपूर्वक धन्यवाद. तुम्ही मुलाखतीचा अर्क टिपला! बुक ब्रो चे अन्य भाग जरूर बघा. विशेषतः अरुणा ढेरे, सत्यशील देशपांडे, आरती अंकलीकर, सुनंदा अमरापूरकर आदी एपिसोड्स
@ravindratamboli997
@ravindratamboli997 Месяц назад
सोशल मीडियापासून ते दूर आहेत हे ही महत्वाचे! ट्विटर वगळून
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
आणि ट्विटर देखील त्यांचे कार्यालयीन सहाय्यकबघत असतात हे मुलाखतीत ते बोलले आहेतच! मुख्य मुद्दा म्हणजे मनाने कुठल्या समाज माध्यमात त्यांची गुंतवणूक नाही ! रवींद्र सरधन्यवाद
@nehanadkarni1001
@nehanadkarni1001 Месяц назад
एका तेलियाने पासून लेखक गिरीश कुबेर यांचे फॅन आहोतच पण त्यांच्यातील संपादकीय वर लेखक म्हणून परिणाम होतो का ? मला वाटलं असा प्रश्न होता कदाचित मी चुकत असेन पण लेखक म्हणून त्यांचे खूप मोठं काम आहे पण संपादक म्हणून ते एकतर्फी दृष्टीकोनातून कधी कधी लिहल जात असा खूप वैयक्तित वाटत माझी राजकीय बुद्धी कदाचीत कमी पडत असेल 🙏
@anirudhayerunkar2393
@anirudhayerunkar2393 Месяц назад
@@nehanadkarni1001 kuthlahi drushtikon kayamach ektarfi asto. Kayam chuk aahe ki Barbar. Satya ki asatya he baghav.
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
पहिले प्रथम व्हिडिओ बघून प्रतिक्रिया दिल्याबद्दल नेहा जी मन पूर्वक धन्यवाद. तुम्ही उपस्थित केलेले प्रश्न महत्त्वाचे आहेत. चॅनल सबस्क्राईब करून बुक ब्रो चे उर्वरित एपिसोड सवडीने अवश्य बघावेत ही विनंती
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
​@@anirudhayerunkar2393यासंदर्भात विजय तेंडुलकर यांनीनीलिमा बोरवणकर यांच्या कथासंग्रहाच्या प्रस्तावनेत लिहिलेले वाक्य आठवले. ते आगामी बुक ब्रो एपिसोड मध्ये आहे. तेंडुलकर म्हणतात, सत्य असे काही नसतेच!!
@anirudhayerunkar2393
@anirudhayerunkar2393 Месяц назад
@@AshusTunes agadi barobar. Jyala tayala vatat tyach satya he satya aahe. Aani tech toh khar manato kadhi kadhi ayuhyabhar tech mantat Lok.
@anitadeshpande598
@anitadeshpande598 Месяц назад
सरांची मुलाखत चांगली झाली
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
व्हिडिओ बघून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद अनिता जी. चॅनल सबस्क्राईब करून बुक ब्रो चे बाकीचे एपिसोड देखील सवडीने बघावे ही विनंती.
@डॉ.प्रियानिघोजकर
व्वा! तुमची ही मुशाफिरी जाणत्या वाचकांसाठी,लिहित्या हातांसाठी नि निव्वळ जगणं समजून घेऊ पाहणाऱ्या व्यक्तींसाठीही अगदी मेजवानीच आहे आशुदा.संवादातली सहजता भावली. धन्यवाद😊🎉🎉 ‌..... डॉ.प्रिया निघोजकर.
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
खूप खूप धन्यवाद प्रियामॅडम ❤ किती सुंदर शब्दांमध्ये प्रतिक्रिया लिहिली आहे🎉
@bharatilimaye6083
@bharatilimaye6083 Месяц назад
नमस्कार सर,आणि आशुतोष
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
नमस्कार भारतीताई
@kirtisathaye4425
@kirtisathaye4425 Месяц назад
मस्त मुलाखत. Regal Aloofness! जबरदस्त शब्द. लोकसत्ता आग्रलेख..चा ध्यास लागतो.कोविड चे खूप जास्त आवडले होते.
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
@@kirtisathaye4425 तुम्ही तो regal aloofness मुद्दा अचूक टिपलात! धन्यवाद कीर्ती जी 💗🙏
@themultiverse7600
@themultiverse7600 Месяц назад
तो मागे घेतलेला अग्रलेख वाचला नाही वाटत 😂
@टिरंजननकले
@टिरंजननकले 26 дней назад
@@themultiverse7600 जे परदेशातील विशेष करून अमेरिकेतील वृत्तपत्रे वाचत नाहीत त्यांना गिरीश कुबेर ह्यांच्या लेखांचे आकर्षण असते.
@charupatwardhan9686
@charupatwardhan9686 Месяц назад
ग्रेट गिरीश सर किती सहज बोलतात! आशुतोष, समृद्ध करणारा एपिसोड! धन्यवाद 🌹🤝
@AshusTunes
@AshusTunes Месяц назад
खूप खूप धन्यवाद ❤
@abhishekpaithankar7285
@abhishekpaithankar7285 23 часа назад
Chear arengment is not write
Далее
Как открыть багажник?
00:36
Просмотров 16 тыс.
Как снимали мой клип POLI - Котик
00:37