नाम हे नगरी वैकुंठ पंढरी - संत नरहरी सोनार अभंग नाम हे नगरी वैकुंठ पंढरी । नांदता श्रीहरी पांडुरंग ॥ १ ॥ नरदेहीं जन्मले पंढरीस गेले । दृष्टीभरि पाहिले पांडुरंग ॥ २ ॥ भीवरेचें स्नान देवाचें दर्शन । पाप हे जळोन जाय तेथें ॥ ३ ॥ चरणावरी माथा नरहरी ठेविला । ह्रदयीं बिंबला पांडुरंग ॥ ४ ॥