सुंदर माझें जातें गे फ़िरे बहुतेकें | Sundar maze jate | Vasantgadkar
#vasantgadkar #bhajan #kirtan
सुंदर माझें जातें गे फ़िरे बहुतेकें |
ओव्या गाऊं कौतुकें तूं येरे बा विठ्ठला ||धृ||
जीव शिव दोनी खुंटे गे प्रपंचाचे नेटें गे |
लावुनि पांची बोटें गे तुं ये रे बा विठ्ठला ||1||
सासु आणि सासरा दीर तो तिसरा |
ओव्या गाऊं भ्रतारा तूं येरे बा विठ्ठला ||2||
बारा सोळा गडणी अवघ्या कामिनी |
ओव्या गाऊं बैसूनि तूं येरे बा विठ्ठला ||3||
प्रपंच दळण दळिलें पीठ भरिलें |
सासुपुढें ठेविलें तूं येरे बा विठ्ठला ||4||
सत्वाचें आधण ठेविलें पुण्य़ वैरिलें |
पाप तें उतूं गेलें तूं येरे बा विठ्ठ्ला ||5||
जनी जातें गाईल कीर्त राहील |
थोडासा लाभ होईल तूं येरे बा विठ्ठला ||6||
15 окт 2024