Тёмный

सोयाबीन पिवळे पडल्यास काय करावे | soybean yellow mosaic virus control 

BharatAgri Marathi
Подписаться 170 тыс.
Просмотров 14 тыс.
50% 1

▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!
👉लिंक - krushidukan.bharatagri.com/
====================================================================
👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
🌱 भारतअ‍ॅग्री मध्ये आपले स्वागत आहे.
✅आजचा विषय - 🌱सोयाबीन पिवळे पडल्यास काय करावे | soybean yellow mosaic virus control👍
सोयाबीन पिकावरील नुकसान कारक रोगांपैकी पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक होतो. हा विषाणूजन्य रोग मुंगबिन येलो मोझॅक या विषाणू मुळे होतो, या रोगाचा प्रसार मावा आणि पांढरी माशी मुळे डाळ वर्गीय कडधान्ये पिके मुंग, उडीद,चवळी, मटकी, वाल, सोयाबीन या पिकांवर होतो. ह्या रोगामुळे पिकाचे 70 ते 90% पर्यंत नुकसान होऊ शकते.
1️⃣विषाणूची लागण कधी होते - पेरणीकेल्यानंतर 20 दिवसाचा पावसाचा खंड पडला व नंतर पाऊस पडला तर सोयाबीनचे पीक पिवळे दिसायला लागते, म्हणजे येलो मोझॅकची लक्षणे दिसायला लागतात.
2️⃣सोयाबीन पिवळा मोजेक वायरस लक्षणे -
1. सुरुवातीला रोगग्रस्त झाडावरील पानांच्या शिरांमधील भागावर फिकट निस्तेज, पिवळे ठिपके दिसतात.
2. कालांतराने ठिपक्यांच्या आकारमानात वाढ होऊन संपूर्ण पान पिवळे पडून त्यातील हरितद्रव्याचा -हास होतो. अशा पिवळ्या पानांवर तांबूस-करपट रंगाचे ठिपके दिसतात.
3. रोगग्रस्त झाडांवरील पाने अरुंद व वेर्डीवाकर्डी होऊन त्यांचा आकार लहान होतो.
4. रोगग्रस्त झाडांवरील शेंगाची संख्या कमी होऊन त्यात लहान आकाराचे दाने भरतात किंवा संपूर्ण शेंगा दानेविरहीत व पोचट होतात आणि पर्यायाने उत्पादनात लक्षणीय घट येते.
3️⃣सोयाबीन पिवळा मोजेक वायरस प्रादुर्भावाची कारणे आणि प्रसार -
1. हा रोग मुंगबीन यलो मोझॅक या विषाणुंमुळे उद्भवतो.
2. सोयाबीनच्या उभ्या पिकातील विषाणूग्रस्त झाडांपासून पांढरी माशी या किंडीद्वारे या रोगाचा प्रसार होतो.
3. या रोगाचा विषाणू केवळ कडधान्य पिकांवर येत असल्याने बिगर मोसमी हंगामात मूग, उडीद, वाल, चवळी, घेवडा इत्यादी पर्यायी पिकांवर जिवंत राहून सोयाबीन पिकावर संक्रमित होतो.
4. रोगास बळी पडणा-या वाण/जातीची लागवड केल्याने या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. जेएस 335 हा वाण या रोगास बळी पडतो.
4️⃣व्यवस्थापन -
1. पेरणीसाठी निरोगी बियाण्याचा वापर करावा.
2. सोयाबीन पिकाबरोबर मका किंवा तूर ही आंतरपिके घ्यावीत.
3. शेत तणमुक्त ठेवावे.
4. शेतात या रोगाची लागण दिसताच रोगग्रस्त झाडे समूळ उपटून नष्ट करावीत.
5. पिवळा मोझॅक या रोगाचा प्रसार पांढरी माशी द्वारे होत असल्याने या किंडीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.
6. एकरी 10 पिवळे चिकट सापळे लावावेत.
7. बीजप्रक्रिया - थायोमिथोक्साम 30 टक्के एफ.एस या किंटकनाशकाची 10 मिली + पाणी 10 ते 20 मिली प्रति किलो बियाणे या प्रमाण बीजप्रक्रया करावी.
8. पीक पेरणीनंतर 20 दिवसांनी जैपैक (थियामेथोक्सम + लैम्ब्डा साइहलोथ्रिन) 10 मिली + IFC स्टिकर 5 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
9. दुसरी फवारणी 35 दिवसांनी कॉन्फिडोर (इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल) 10 मिली + आईएफसी नीम (10000 पीपीएम) 25 मिली + IFC स्टिकर 5 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. अळीचा प्रधुरभाव असल्यास धानुका ईएम 1 (एमेमेक्टिन बेंजोएट 5 % एसजी) 10 ग्राम प्रति पंप मिसळावे.
10. सांगितलेल्या दोन फवारण्या प्रतिबंधात्मक आहेत. सोयाबीन मध्ये प्रधुरभाव झाल्यास अरेवा (थायोमिथोक्साम 25 wg ) 10 ग्राम किंवा लांसर गोल्ड (एसेफेट 50% + इमिडाक्लोप्राइड 1.8 % एसपी) 30 ग्राम + जीओलाइफ नो व्हायरस 50 मिली IFC स्टिकर 5 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
👉भारतअ‍ॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

Опубликовано:

 

17 авг 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 11   
@funwithcutesister8923
@funwithcutesister8923 11 месяцев назад
नमस्कार सर महाधन चे फुलोरा पेशल बद्दल माहिती द्या ???
@ranjeetbhosale5089
@ranjeetbhosale5089 11 месяцев назад
👌👌👌
@funwithcutesister8923
@funwithcutesister8923 11 месяцев назад
👍🙏
@ramlinggire6350
@ramlinggire6350 11 месяцев назад
दोडका आणि कारले पिकातील रोग व्यवस्थापन वर एक विडियो बनवा.
@jagdishmaind653
@jagdishmaind653 11 месяцев назад
Sir apan swaybin var shevtchi fawarni 0.0.50 karu shakto ka
@inspirational.shorts1
@inspirational.shorts1 11 месяцев назад
उडीद मवा फवारणी सांगा सर
@SHIVRAJ_____583
@SHIVRAJ_____583 11 месяцев назад
sar aapan tur mahiti sanga driching sanga mar Rog saga vavstya pan kasekarave
@bharatagrimarathi
@bharatagrimarathi 11 месяцев назад
ओके. यासाठी आपण एक नवीन विडियो लवकरच बनवू
@anilparadhi1463
@anilparadhi1463 11 месяцев назад
सर आम्ही 00:00:50 वापरलत पाने करुपून झाड मरण पावते का सर... माझ्या प्लांट मध्ये फवारल तर काही दुकानदारच मनन आहे कि :00:00:50 शेंग अवस्ते वापरला नको हवे म्हणते तर तुम्हीच सांगा सर असं होऊ शेकते का?
@eknathsadal
@eknathsadal 11 месяцев назад
आयएमसी कंपनीचा प्रचार करायला का
@dnyaneshwarkhode3416
@dnyaneshwarkhode3416 11 месяцев назад
Setakarya La Fasavan Soda Sir Time Lagel Pan 1 Divas Tmhala Bhik Ch Mangayach Kam Padanar Bharat Agri % 20 Madhe Kami Nahi Mahag Ahe Bajarat Bhau Kontya Oshadachi Kimat Paha Mag Bharat Agri Var Paha Bharat Agri Wale Kase Fasawatat Samaja Baajarat 750 Ch Te Tumhala 1250 Sangatat Aani % 20 Manun 1000 La Lavatat 100 % Fasavi Ahe Bharat Agri Bhau
Далее
Армия США вошла в Зангезур
04:17
Просмотров 234 тыс.