Тёмный

#सोळजाई 

Konkani Featured
Подписаться 1,3 тыс.
Просмотров 12 тыс.
50% 1

परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणभूमीत अनेक कलांचा विकास झाला आहे. त्यामध्ये नमन(खेळे), शक्तीतुरा (जाकडीनृत्य), भारुड, डफावरील पोवाडे इ.कलांचा समावेश आहे. कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्हातील नमन (खेळे) या लोककलेची प्रसिध्दी जगभर पसरली आहे. याच कलेचे दुसारे रुप सिंधुदुर्गमध्ये पहावयास मिळते. त्याला “दशावतार” या नावाने ओळखले जाते. नमन आणि दशावतार यामध्ये बरेच साम्य आणि वैधर्म्य आहे.
याबाबतची कथा अशी की,अठराव्या शतकात शामजी नाईक काळे यांनी कर्नाटकातून जो लोककला प्रकार महाराष्ट्रात आणला. त्याचे दोन भाग होऊन एक दशावतार म्हणून दक्षिण कोकणात प्रसिध्द पावला. तर नमन उतर कोकणात होऊ लागला. नृत्य, नाट्य, संगीत यांनी परिपूर्ण असा हा लोककला प्रकार “यक्षगान” या कर्नाटकातील लोककला प्रकाराशी साम्य दर्शवतो. उत्सव प्रिय कोकणात सण, समारंभ म्हटले की मन उचंबळून आल्याखेरीज राहत नाही. प्रामुख्याने सणवारीत, लग्नसमारंभात, सार्वजनिक महोत्सव इ.मध्ये कोकणी संस्कृतीतील विविध लोककला आणि लोकनमन या लोकनृत्य मध्ये गणगौळण मध्ये अनेक सोंगे असतात. सोंगात प्रथम मान गणपतीरायाचा असतो. गणपती पूजन व गणपती गाणे होते. गणेश पुजनात गणेशाची आख्यायिका असते. ही सोंगे झाडांच्या लाकडापासून बनवलेली असतात. मात्र आजच्या तारखेला ही सोंगे अनेक प्रकारची हलकी व प्लास्टिक ,फायबर याची बघायला मिळतात. गणपतीच्या आगमनवेळी इतर सोंगेही दाखवली जातात. यामध्ये नटवा असतो.शंखासूर, वाघ, हरण इ. असून या प्रकारात वापरल्या जाणाऱ्या तलवारी लाकडी असतात. गण झाल्यावर “गवळण” प्रकाराला सुरुवात होते. हा भाग खुपच मजेदार व ऐकण्यासारखा असतो. दही, दूध, लोणी घेऊन गवळणी मथूरेच्या बाजाराला जात असतात. त्यांची वाट (रस्ता )गोकुळातील पेंद्या, सुदामा (श्रीकृष्ण सवंगडी) वाट अडवतात. त्यावेळी गोपीका व पेंद्या, सुदाम यांच्यातर्फे अनेक गाणी व वेगवेगळ्या कला सादर होतात. कृष्णाचे संवगडी गवळींची वाट अडवत त्यांच्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या मालाची लुट करतात. माठही फोडतात. यावेळी मावशी (गवळणी मधील जेष्ठ )अनेक कला सादर करुन नमन रसिकांना हसायला भाग पाडते. गवळणी गाणं म्हणताना या संवगडींना म्हणतात “दहीदुधाचे माठ घेऊनी चाललो मथूरेच्या बाजारी…दह्यादुधाचे नुकसान कान्हा तु का रे करी…!कारण कान्हा रस्त्यामध्ये उभा राहून गवळींची वाट अडवत असतो. त्यावेळी गवळणी त्याला विनंती करतात की, कान्हा सोड आमची वाट,आम्हा जाऊ दे बाजारी…दह्यादुधाने भरल्या घागरी…..! अशा त-हेरे गवळणी नंतर कौटुंबिक जीवनावर आधारीत पण एक चांगला संदेश देणारी छोटीशी नाटीका(फार्स)सादर केली जाते.या नाटीकेचा विषय सामाजिक जनजागृतीचा संदेश देणारी असतो.या संपूर्ण नमन खेळात शिपाई हे आदिच्या पोलीस दलातील हवालदार प्रमाणे असतात.गंभीर विषय विनोदी करुन सांगताना त्यातून अनेक संदेश दिले जातात.आपल्या अभिनयातून सामाजिक परिस्थितीचा आढावा घेत असतात.
शेवटी वगनाट्यात महाभारत ,नल-दमयंती आदी कथा किंवा एकादा सद्दस्थितीचा विचार करुन कथाभाग सादर करण्यात येतो.परमेश्वर धारण केलेल्या दहा अवतारांवर आधारीत सोंगे आणणे,त्यांच्या जीवनावरील काही घटना प्रसंगाचे खेळातून दर्शन घडवणे हा या नाट्याचा उद्देश असतो.आजच्याघडीला बदलत्या काळाप्रमाणे नवे-जुने यांचा स्विकार करत आजचे आधुनिक नमन मुंबईसह कोकणात पहावयास मिळत आहे.
लोककलेतून समाज प्रबोधन व लोकजागृती करणारी ही “नमन “लोककला जोपासायला हवी हीच आमची प्रमाणिक अपेक्षा !

Опубликовано:

 

22 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 6   
@shrikantbhayje8377
@shrikantbhayje8377 Год назад
मुंबई त प्रबोधन कर बोरिवली येथे कार्यक्रम झाला मस्त मी तर एक दिवसांत दोन शो मुंबई त बघीतले... बोरीवली. घाटकोपर...आमचे मित्र ढोलकी फटु... अमोल ढवल.... यांना मानाचा मुजरा करतो....
@jaywantrambade6297
@jaywantrambade6297 7 месяцев назад
श्री पात्र ला जो लूक पाहिजे तो लूक येत नाही या मुळे बाकी सर्व मस्त साउंड सिस्टम भारी सर्व कॅरेक्टर मस्त लय भारी
@umeshshinde8181
@umeshshinde8181 Год назад
वागत समीर तटकरे शिवाय मझ्या नाही तो आता गावी नसतो का
@omkarshinde1218
@omkarshinde1218 Год назад
Nahi
@sanjayrewale8673
@sanjayrewale8673 8 месяцев назад
2024चे नमन कधी होणार आहे 😊
Далее
Unique deep painful back massage for Lisa #chiropractor
00:11
🖤
00:18
Просмотров 205 тыс.
SOLJAI NATY NAMAN MANDAL,  DEVRUKH,  KOLHEWADI
22:26
Просмотров 80 тыс.