@@RohitPatilVlogs हापूस आंब्याच्या कोयी तयार केलेल्या रोपांवर हापूस आंबे येत नाहीत... साधेच येतात. जर तुम्हाला कलमी म्हणजेच हापूस आंबे हवे असतील तर त्यावर दुसर्या हापूस आंब्याच्या झाडाची कलमकांडी जोडून कलम (graft) करावे लागते.
तुम्ही कोणत्याही कलमी झाडाच्या कोयी रुजवायला लावल्यात तरी त्यापासून तयार होणारी रोपे ही साधीच असतात. ठराविक कालावधीनंतर त्यावर कलमी आंब्याच्या रोपाचे कलम करावेच लागते.