🙏🌼श्रीक्षेत्र गिरनार_श्री दत्त महाराजांचे निवास स्थान🌼 ठिकाणं_जुनागड जिल्हा (गुजरात राज्य)...
🙏😎नमस्कार मित्रांनो हे माझ युट्यूब चॅनेल आहे. 🎬amitoctober vlogs ...
---------------------------------------------------------------------
श्रीक्षेत्र गिरनार दत्तप्रभूंचे अक्षय निवासस्थान
स्थान: जुनागड जिल्हा सौराष्ट्र (गुजराथ राज्य), हिमालयाचे पेक्षाही जुना पर्वत समूह, पूर्वी रेवतक पर्वत म्हणून उल्लेख
सत्पुरूष: श्री दत्तमहाराजांचे अक्षय निवास स्थान
विशेष: श्री दत्तपादुका, नाथ संप्रदायाचे उपासना केंद्र, नेमिनाथ भगवान मंदिर, गीर जंगल, कमंडलू कुंड, आंबा मातेचे स्थान.
गिरनार पवित्र डोंगर
गिरनार पवित्र डोंगर
दत्तात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष निवास केला आहे असे ठिकाण पर्वतशिखरांचा समूह म्हणजे श्रीगिरनार!
१०,००० पायऱ्या चढुन जाणं हे शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी पाहणार असलं तरी दत्तभक्तांनी एकदा तरी जायलाच पाहिजे असं ते स्थान आहे. भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनीत केलेले आणि बारा हजार वर्षे तपाने सिध्द केलेले स्थान म्हणजेच पूर्व इतिहास व परिसर गिरनार अशी दत्तभक्तांची अनन्य श्रध्दा आहे. भौगोलिक दृष्ट्या असंख्य छोट्या मोठ्या पर्वतांचा, शिखरांचा आणि सुळके यांचा समूह असलेला हा परिसर आहे. शिवपुराणात गिरनारचा उल्लेख रेवताचल पर्वत म्हणून करण्यात आला आहे. स्कंद पुराणात रैवत, रेवताचल, कुमुद, उज्जयंत अशी गिरनारची नावे आढळतात. रेवताचल, कुमुद, उज्जयंत हि नावे त्रैमुर्ती (ब्रह्मा, विष्णू, शंकर) यांच्याशी निगडीत आहेत.
🙏🌼..श्री गुरूदेव दत्त..🌼🙏
व्हिडिओ पहिल्याबद्दल धन्यवाद..
---------------------------------------------------------------------------
🔹अमित म्हात्रे,अलिबाग
🔹विशेष आभार: प्रशांत पिंपळे..अलिबाग
2 мар 2023