खूपच छान सुंदर पद्धतीने तुम्ही कुरडया तयार करण्याची रेसिपी सांगितली ताई खूप खूप धन्यवाद तुमचे आजकालच्या नवीन मुलींना खूप मार्गदर्शक आहे तुमचं कुरडई बनवण्याबद्दल च ज्ञान❤😊✌👍🎊🎊
Khupach chan ani perfect recipe sangitli tai tumhi...tai chik tumhi ravivari ratri kadhale ka sakali?tin divas bhijat thevun ratri mhnjhe 6-7vajta chik kadhu shkto ka ani ratr bhar thevun sakali kurdya karu shkto ka?
30 वर्षा पूर्वी मी अशीच करत होते पण तेव्हा मात्र मोबाईल नव्हता 😢 ह्याचा खेद आहे आता मी सगळे कुरडई करणे सोडून दिले आहे ,तेव्हा 10 kg बनवायचे ❤ तुमचा व्हिडीओ पाहून ,पुन्हा करावेसे वाटते👍👌👌
वैभवी रेसिपी... आम्ही घरी अशाच प्रकारे..म्हणजे.. पारंपारीक पद्धतीने गव्हाच्या चिकाच्या कुरडया कित्येक वर्षा पासून करत आहोत... पण आता..आजच्या धावपळीच्या काळात असे वाळवणाचे करणं फार कठीण होऊनबसलंय.. एकतर वाढत्या वयामुळे फार दगदगीची कामं होत नाहीत.. कुणाला सोबत घेऊन करू म्हटलं तर तेही फारसं होत नाही... अशा वेळी काहीतरी तडजोड करावी लागते आणि आपली ही आवड जोपासावी लागते. घरात काही केलं तरच चांगले... खायला मिळते... नाहीतर कोठून तरी जुगाड जमवावं लागतं.,... 😂 आजचा हा विडिओ फार उत्तम वाटलाय... फार छान आणि सोपं करून सांगितलं.... नवीन मुली देखील करून बघू शकतील.. फार छान... 🌹🙏 बेटू... तुला खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद 🌹👌🤗
पद्धत योग्य आहे.पण उन्हाळ्यात वाळवण करतो.त्यामुळे जास्त दिवस लावले तर चिकाला आंबट चव येते.म्हणून चवथा दिवशी चिक करून पाचव्या दिवशी शिजवून कुरडया वाळत टाकाव्या.एक टिप गहू भिजत घालताना मूठभर मीठ टाकावे. म्हणजे वाटताना चिकट होत नाही.वरच्या पाण्यात ते विरघळते आणि चिकात मिसळत नाही. मी हिंग घालते त्यांनी चव सुरेख येते.मात्र रोजचा वापरातील नाही. त्यांनी कुरडया ना पिवळसर रंग येतो.बाजारात हिरा हिंग खास मिळतो .तो खूप strong असतो. हरबर्या chya एका दाण्याच्या आकाराचा भिजत घालून ते पाणी चिक शिजविताना घालावे.एकदा हिरा हिंगाचा लहान खडा आणला की खूप वर्षे पुरतो.पाण्याला उकळी आली की मीठ आणि हिंगाचे पाणी घालावे