महाराष्ट्रातील विख्यात लेखक अरविंद दादा जगताप यांचा आज दि. 21 मे 2017 ला पुण्यनगरी अंकासोबत आलेल्या प्रवाह पुरवणीत "आता बोला" हा लेख वाचून खूपच छान वाटलं .... खरचं आज पासून 4 ते 5 वर्षाआधी शिक्षणाचा कसा मसान वाटा झालेला होता आणि हे मार्मिक पने मांडलेले आहे... खरं तर ही विचार करायला लावणारी गोस्ट आहे. आदरणीय महोदय जगताप जी यांनी मांडलेल्या लेखातील चिंतनशील लेख वाचल्या नंतर सरांशी आज प्रत्यक्ष फोनवर बोलून खूप आनंद झाला. बोलण्यातील सौम्यता व मृदुभाषी व्यक्तिमत्व असा दादांचा आवाज खरचं कानाला वेड लावून तर गेलंच शिवाय फोन कट केल्यावर अरविंद जी बद्दल नेट वर माहिती काढली असता खूप विख्यात व्यक्तिमत्व असल्याचे समजले. "चला हवा येऊ द्या" मधील प्रसिद्ध पत्राचे लेखन दादांचे असल्याचे समजले. अशा या आगळ्या वेगळ्या लेखकांना मनपूर्वक शुभेच्छा...! स्नेह वंदन🙏 💐💐💐💐💐 *आपला स्नेही* शिवदास भंडारी, जरूड अमरावती , महा.
अरविंद जगताप यांची लेखणी शब्दांना धार देते, माणुसकी जागी करून डोळे ओले करून जाते.. वाचणारा हि न्याय देतो परजलेल्या शब्दांना, वाटते जणू थांबू नये पत्र वाचताना..पत्र वाचताना..