Best Of Sunil Pal | Part 7 Subscribe To Us For Lots Of Laughter : goo.gl/K1NSyY Facebook : / b4u-comedy-10993957201... Twitter : THEOFFICIALB4U Instagram : THEOFFICIALB4U Website : www.b4utv.com
सिद्ध व सधीत शब्द : 1. सिद्ध शब्द भाषेत जे शब्द मुळात धातू असतात त्यांना ‘सिद्ध शब्द’ असे म्हणतात. उदा. ये, जा, खा, पी, बस, उठ, कर, गा इत्यादी. सिद्ध शब्दांचे 3 प्रकार पडतात. तत्समतदभवदेशी (यांचा अभ्यास आपण यापूर्वी केला आहे.) 2) साधीत शब्द सिद्ध शब्दाला म्हणजेच धातूच्या पूर्वी उपसर्ग किंवा नंतर प्रत्यय लागून ‘साधित शब्द’ तयार होतो. साधित शब्दांचे पुढील 4 प्रकार पडतात उपसर्गघटितप्रत्ययघटितअभ्यस्तसामासिक 1. उपसर्गघटित शब्द शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात. तसेच अशी अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात त्या शब्दांना ‘उपसर्ग घटित शब्द’ असे म्हणतात. उदा. अनुभव, अपयश, अधिकार, अवगुण अधिपती, उपहार, आकार, साकार, प्रतिकार, प्रकार इ. वरील शब्दांमध्ये अनु. अप, अधि, अव, अधि, उप, आ, सा, प्रति,प्रइ. उपसर्ग लागलेली आपल्याला दिसतात. असे उपसर्ग लागून तयार होणार्या शब्दांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात. 2. प्रत्ययघटित शब्द धातूच्या किंवा शब्दांच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून प्रत्यय तयार होतात व तयार होणार्या शब्दांना ‘प्रत्ययघटित शब्द’ असे म्हणतात. उदा. जनन, जनक, जननी, जनता इ. वरील शब्दांना न,क, नी ता ही प्रत्यय लागलेली आपल्याला दिसतात असे प्रत्यय लावून तयार होणार्या शब्दांना ‘प्रत्ययघटित शब्द’ असे म्हणतात. 3. अभ्यस्त शब्द एखाधा शब्दांत एका शब्दाची अथवा काही अक्षरांनी पुनरावृत्ती झालेली असते. अशा शब्दांना ‘अभ्यस्त शब्द’ असे म्हणतात. अभ्यसतचा अर्थ दुप्पट करणे असा होतो. उदा. आतल्या आत, शेजरीपाजारी, किरकिर इ. अभ्यस्त शब्दांचे खलील 3 प्रकार पडतात. i) पूर्णाभ्यस्त ii) अंशाभ्यस्त iii) अनुकरणवाचक i) पूर्णाभ्यस्त शब्द एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा येऊन जोडशब्द तयार होतो त्याला पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात.उदा. बारीक बारीक, कळाकाळा, आतल्या आत, हळहळ, वटवट, कळकळ, मळमळ, बडबड, समोरासमोर, हळूहळू, पुढेपुढे, पैसाच पैसा, मजाच मजा, हिरवेहिरवे इ. ii) अंशाभ्यस्त शब्द जेव्हा पूर्ण शब्द हा जोडशब्दात जशाच्या तसा पुन्हा येतो एखादे अक्षर बदलून येतो तेव्हा त्या जोडशब्दांना अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतात.उदा. अदलाबदल, उलटसुलटा, शेजारीपाजारी, बारीकसारीक, लाडीगोडी, सोक्षमोक्ष, जिकडेतिकडे, गोडधोड, गडबड, जाळपोळ, दगडबिगड, किडूकमिडूक, घरबीर इ. iii) अनुकरणवाचक शब्द ज्या शब्दांमध्ये एखाधा ध्वनिवाचक शब्दांची पुनरावृत्ती झालेली असते, अशा शब्दांना अनुकरणवाचक/नादानुकारी शब्द असे म्हणतात.उदा. किरकिर, खडखडाट, रिमझिम, गुणगुण, घणघण, कडकडाट, टिकटिक, गडगड इ. 4. सामासिक शब्द जेव्हा दोन किंवा अधिक शब्द एकमेकांमधील परस्पर संबंधामुळे एकत्र येऊन तयार होणार्या शब्दाला ‘सामासिक शब्द’ असे म्हणतात. उदा.