Тёмный

Gajanan Chalisa By Gauri Gaikwad Shinde | Gajanan Maharaj Sansthan, Shegaon | Moreshwar Nistane 

RHYFIL Marathi
Подписаться 4,3 тыс.
Просмотров 2,4 тыс.
50% 1

प्रगट दिनाच्या शुभ पर्वावर सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या सेवेत प्रथमच आम्ही भाविकांसाठी घेऊन येतो आहोत..
श्री गजानन चालीसा श्रध्दा सुमने
विशेषतः शेगाव या पावन भूमीत जन्मलेल्या.
मीनाक्षी गोरंटीवार यांच्या लेखणीतून साकारलेली आणि मोरेश्वर निस्ताने यांनी संगीतबद्ध केलेली ही गजानन चालीसा भक्ती रंगात रंगलेली आहे..
गायक कलावंत :--
मुकुल पांडे ,मोरेश्वर निस्ताने ,प्रसन्ना जोशी ,दत्ता हरकरे ,राजेश तीतरमारे, गौरी गायकवाड शिंदे ,श्रेया खराबे टाकसाळे, अंकिता टकले टिकेकर, स्वस्तिका ठाकूर ,कनका हरकरे या नामांकित गायक गायिकांचे सूर या चालीसाला लाभले आहेत.
चित्रीकरण/ संकलन :--मनोज पिदडी यांचे आहे
ध्वनिमुद्रक :-नितीन कायरकर
ध्वनिमुद्रण :-अनाहद रेकॉर्डिंग स्टुडिओ
🙏आम्ही ऋणी आहोत
यातील प्रत्येक कलावंताने आपले योगदान दिले आहे.. आपली सेवा श्रीचरणांशी समर्पित केली आहे..
महाराजांच्या कृपेने ही चालीसा भाविकांच्या घराघरात पोहचेल असा आम्हाला दृढ विश्वास आहे.कारण महाराज आपल्या भक्तांचे मनोरथ पूर्ण करतात हा भक्तांचा स्वानुभव आहे.
जय गजानन 🙏🙏
१) श्री गजानन चाळिसा.🙏🙏
१) गुरुदेवा गजानना गुरुदेवा
हरी देवा गजानना गुरुदेवा
२) जन्म मृत्यूचा चुकवा फेरा
कृपा करा गुरूवरा
३) कार्यारंभी स्मरण करावे
गजाननाचे नाम जपावे
४) संकटकाळी धावुनी येतो
तिमिरामधुनी वाट उजळतो
५) माघवद्य सप्तमी दिनी
प्रगट जाहला दिनमणी
६) पातुरकरांच्या वाड्यावरचा
अनुप सोहळा ऋतुशांतीचा
७) भोजनास त्या बसल्या पंक्ती
योगीवर ते शिते वेचती
८) कृतीस त्यांंच्या देखोनिया
बंकट गेला भारावुनिया
९) भाव भक्तीच्या नाण्यावरती
प्रसन्न होई सद्गुरू मुर्ती
१०) काशीच्या त्या गोसाव्याचा
हट्ट पुरविला तू चिलमिचा
११) सचित्त स्वरूपा आत्मारामा
धडा शिकवशी जानकीरामा
१२) क्षणात आणिले जल विहरिला
भास्कर मागे क्षमा गुन्ह्याला
१३) उदक लागले तव भक्तीचे
पिक येऊ दे सत्कर्माचे
१४) आग उसळता मोहळ उठले
हा हा म्हणता लोक पळाले
१५) लाडू खाण्या जमती सारे
संकटकाळी फिरती वारे
१६) पाटील बंधू उर्मट सारे
अरेतुरेचे बोलणे न्यारे
१७) अखेर तुजला शरण आले
नि:सीम पुढे भक्त जाहले
१८) आदेश दिला ब्रह्मगिरीला
त्याग म्हणाले अवडंबराला
१९) पावन तुझ्या सहवासाने
द्वाडपण सोडले अश्वाने
२०) सुकलालाची ती गोमाता
शांत जाहली चरणी येता
२१) तुझ्या कृपेने भास्कर तरला
प्रयाण केले वैकुंठाला
२२) कितीक गाऊ देवा महती
आज्ञा पालन काकही करती
.........
२३) भक्तासाठी धावुनी गेला
वाचविले तू गणु जवऱ्यला
२४) भक्त शिरोमणी पितांबराने
पालवी आणिली गुरू कृपेने
२५) अतूट श्रद्धा बाबांवरती
रोगमुक्त झाला गंगाभारती
२६) बंडूतात्या कर्जात बुडाला
तुम्हीच दिले द्रव्यघटाला
२७)नौका फुटली ओंकारेश्वरी
माय नर्मदा लावी किनारी
२८ ) प्रसाद टिळकांनी ग्रहण केला
गीतारहस्य जन्मास आला
२९) दिल्या पादुका पुंडलिकाला
स्वप्नामध्ये तुम्ही पुजनाला
३०) कवराची ती झुनका भाकर
तुम्ही केली जगी अजरामर
३१) बायजाबाई जनाई समही
भक्तीस तिच्या तोडच नाही
३२) धारण करुनी विठ्ठल रूपाला
बापू काळ्यांना साक्षात्कार दिला
३३) महाराज वंदले प्रिय हरीला
थोडे दिवस मी संगतीला
३४) भाद्रपद शुद्ध पंचमीला
गजाननाने प्राण रोधिला
३५ ) शेगाव ग्रामी वसली माऊली
डोईवर राहो तिची सावली
३६) नित्य भाविकांचा भरतो मेळा
तृप्त होती देखोनी सोहळा
३७) डंख विखारी रोज मनाला
छळ छळ छळती प्रत्येकाला
३८) सदा लाभो अम्हा जिव्हाळा
मोक्ष पदाला न्यावे दयाळा
३९) श्री चालीसा नित्य पठावा
गुरू कृपेचा महिमा जाणावा
४०) काय वर्णावी मी दिव्य गाथा
तुझिया चरणी ठेविते माथा
मीनाक्षी गोरंटीवार ...✍️
.....................
CREDITS :
SONG : GAJANAN CHALISA
LYRICS : MINAKSHI GORANTIWAR
SINGAR : MORESHWAR NISTANE, PRASANNA JOSHI, MUKUL PANDE, DATTA HARKARE, RAJESH TITARMARE, ANKITA TAKLE TIKEKAR, GOURI GAYKVAD SHINDE, KANKA HARKARE, SHRYA TAKSALE KHARABE, SWASTIKA THAKUR
MUSIC : MORESHWAR NISTANE
SONG PROGRAMED/ ARRANGED BY : RAJESH /PUSHKAR
SONG RECORDED AT : ANAHAD STUDIO
RECORDING ENGG : NITIN KAYARKAR
INSTRUMENTS PLAYER
SHAHNAI : KHADSE
MRUDAGAM / TABLA : DEVENDRA YADAV
GUITAR : SANJAY GADE
VIDEO CREDIT :
VIDEO SHOOT / EDITING SPECIAL EFFECTS BY : SHREE
EDIT : MANOJ MANOHAR PIDDI
POSTER DESIGN BY WAISHALI KOLARKAR
SPECIAL THANKS TO AMRUT PRATISHTHAN
#gajanan_maharaj_shegaon #gajananchalisa #gajananmauli

Опубликовано:

 

20 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 23   
@pradnyakulkarni4471
@pradnyakulkarni4471 6 месяцев назад
🚩जय गजानन गजानन चरणी सेवा सार्थकी लागली..! सुंदर स्वर,संगीत गीत 💐💐💐
@jyotiitkelwar6311
@jyotiitkelwar6311 Месяц назад
जय गजानन श्रीगजानन खूप छान गाईली गौरी
@snehashewalkar1833
@snehashewalkar1833 6 месяцев назад
अतिशय सुरेख शबदरचना..मिनाक्षी व अप्रतिम गायन .संपूर्ण टिमचे मनःपूर्वक अभिनंदन 🌹🌹 जय गजानन माऊली 🙏🙏
@MeghnaNistane
@MeghnaNistane 6 месяцев назад
भावपूर्ण आणि सुरेल आवाज संगीत अप्रतिम संपूर्ण टीम चे अभिनंदन
@mahanandakolhe2140
@mahanandakolhe2140 6 месяцев назад
अभिनंदन गौरी खूप छान म्हटलं 🎉
@udayrajkarne9986
@udayrajkarne9986 6 месяцев назад
जय गजानन 🙏 मोरू दादा आणि संपूर्ण टीम ला खुप खुप शुभेच्छा 💐🙏❤️
@rashmipawar3050
@rashmipawar3050 3 месяца назад
Khupchan Jay Gajanan mauli Gan Gan Ganat Bote Gan Gan Ganat Bote Gan Gan Ganat Bote
@TusharRangari-jx8ri
@TusharRangari-jx8ri 6 месяцев назад
Exellent 👌
@jyotsnaninawe5262
@jyotsnaninawe5262 6 месяцев назад
Beautiful song, well sung with very sweet and melodious voice. Congratulations to all of you and the lead singer.
@sonalgadewar6077
@sonalgadewar6077 6 месяцев назад
मिनाक्षीजींची शब्द रचना खूप भावपूर्ण आणि खूप आर्तता आहे लिखाणात.. खूप अभिनंदन आपले सुध्दा मिनाक्षीजी 💐💐💐
@sonalgadewar6077
@sonalgadewar6077 6 месяцев назад
अतिशय सुंदर शब्दरचना आणि तेवढेच सुमधुर गायन.. जय गजानन 🙏🙏🚩
@shashwat8922
@shashwat8922 6 месяцев назад
उत्तम... खूप सुरेल.. अभिनंदन.
@janraodehale7164
@janraodehale7164 6 месяцев назад
खुप सुंदर गायीले आहे पुर्ण चमुची उत्तम कामगिरी ❤❤❤❤😊😊😊😊
@sonalgadewar6077
@sonalgadewar6077 6 месяцев назад
आपणा सर्व गायकांचे मनापासून अभिनंदन आणि खूप शुभेच्छा 💐💐💐
@shardulshinde1800
@shardulshinde1800 6 месяцев назад
khup dhanywad sarwanche
@anujamote9343
@anujamote9343 6 месяцев назад
Mastach
@snehalkuchankar
@snehalkuchankar 6 месяцев назад
जय गजनन
@rajkanade2864
@rajkanade2864 6 месяцев назад
🙏🙏🙏
@asawaribodhankarjoshi198
@asawaribodhankarjoshi198 6 месяцев назад
Wawa mast
@rashmipawar3050
@rashmipawar3050 3 месяца назад
Jay Gajanan mauli Gan Gan Ganat Bote Gan Gan Ganat Bote Gan Gan Ganat Bote Gan Gan Ganat Bote
@shwetashelgaonkar
@shwetashelgaonkar 6 месяцев назад
जय गजानन
@prakashkhandagale67
@prakashkhandagale67 6 месяцев назад
🙏🌺🌹🌸🌷🙏
@vilasnimbalkar8798
@vilasnimbalkar8798 6 месяцев назад
छान आवाज आहे ग बाई तुझा. कोटून शिकली बाई माहीत नाही
Далее
Stavan - Gajanan Gunagara Param Mangala Pavana
6:05
Просмотров 3,3 млн