Тёмный

Haripath Abhang Second (हरिपाठ अभंग दुसरा) 

Geeta Dnyan
Подписаться 5 тыс.
Просмотров 848
50% 1

अभंग दुसरा Haripath with Lyrics in Marathi
( हरिपाठ गाण्याच्या शब्दांसह मराठी मध्ये)
॥ दोन ॥
चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥१॥
मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्गु ॥२॥
एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमी न घाली मन ॥३॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥
Sampoorna Haripath contains music track sung by Baba Maharaj Satarkar and The actual wordings can also be seen
चहूं-चारही; वेदीं-वेदांनी; जाण-जाणून घेतले; साहीशास्त्रीं-सहाही शास्त्रांनी;
कारण-आधार; अठराही-अठराही; पुराणें-पुराणे; हरिसी-विष्णु देवा चे एक नाव;
गाती-गुणगान गाताना/बद्दल सांगणे; मंथुनी-घुसळणे/मंथन; नवनीता-लोणी;
तैसें घे-तसं घेणे; अनंता-परब्रह्म/हरि; वायां-विना कारण; व्यर्थ-निरर्थक; कथा-गोष्ट;
सांडी-त्यागने; मार्गु-मार्ग; एक हरि-परब्रह्म; आत्मा-आत्मा; जीवशिव-जीव व शिव;
सम-सारखा/एकच; वायां-विना कारण; तू-तू; दुर्गमी-गोंधळ/अवघड; न-नाही/नको;
घाली-घालणे; मन-मन; ज्ञानदेवा-ज्ञानेश्वर महाराज; पाठ हरि- "हरिपाठ"/
नित्यपाठ "हरी-हरी" म्हणणे; हा-तेच माझे; वैकुंठ-श्री हरीचे नित्य निवासस्थान;
भरला-भरलेला; घनदाट-सर्वत्र घनदाट; हरि-विष्णु देवा चे एक नाव; दिसे-दिसत;
भावार्थ
चारही वेद जाणून घेतले, सहाही शास्त्राचा आधार किंवा अठरा पुराणे जरी पाहिली,
हे हरी बद्दल गुणगान गाताना/सांगताना दिसतात.
लोणी जसे घुसळून वेगळे काढून घेता येते, तसे वेदशास्त्रपुराणे घुसळून लोण्या सारखे "हरीनाम" मिळते.
विना कारण निरर्थक मार्गचा व गोष्टींचा त्याग कर.
जीव व शिव, आत्मा व परमात्मा, हे सारखा/एकच आहे.
याबद्दल विना कारण तू मनामध्ये गोंधळ/अवघड घालू नको.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. नित्य पाठ "हरी-हरी" म्हणणे, तेच माझे वैकुंठ आहे.
तो हरी सर्वत्र घनदाट भरलेला मला दिसत आहे.

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
when you have plan B 😂
00:11
Просмотров 15 млн
Sant Dnyaneshwar (Vyakhan)
58:30
Просмотров 142 тыс.
when you have plan B 😂
00:11
Просмотров 15 млн