खूप छान फिल्म बनवली आहे यामध्ये दुहेरी संदेश दिला आहे मैत्री बद्दल प्रेम तसेच शेतकरी काही पण करू शकतो तो कोना कडे ही मोकळ्या हाताने जात नाही अशाच छान फिल्म बनवत राहा पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
सर्वच पात्रांचा अभिनय अतिशय उत्तम आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली गुंठा मंत्री संकल्पना किती घातक आहे हे आताच्या पिढीला कळायला हवं. कारण शेतकऱ्यांनी शेती पिकवली तरच जगाचा उदरनिर्वाह चालू शकतो, त्यामुळं शेती वाढवली नाही तरी चालेल,पण आहे ही शेती टिकवायला हवी . ' वावर हाय तर पावर हाय '
सर्वांनी खूपच छान अभिनय केला आहे ...शेती व शेती करणारा बळीराजा नामशेष होत चालले असून जग जिवंत राहण्याच्या दृष्टीने या बळीराजाचे अस्तित्व खूपच महत्त्वाचे आहे तरच माणूस व माणुसकी टिकेल हे छान पद्धतीने मांडलेले आहे....सर्व टीम चे पुन्हा एकदा अभिनंदन व पुढील प्रवासासाठी शुभेच्छा
अतिशय सुंदर अशी संकल्पना तुम्ही सगळ्यांपूडे सादर केली, एखाद्या शेतकऱ्याने ठरवले तर तो काहीही करू शकतो उगाचच शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हंटले जात नाही 🚩🚩🚩🚩
अतिशय वास्तव विषय मांडला खरच मनापासून सलाम सगळ्यांना चार पैशापायी आपण जमीन विकतो आणि नंतर त्याच जमिनाचा कोट्यावधी मध्ये व्यवहार होतो शेतकरी राजा दिवस रात्र शेतात राबतो तरी देखील त्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही कधी पाऊस पडला नाही म्हणून नुकसान तर कधी पाऊस जास्त झाला म्हणून नुकसान होत या सगळ्या अडचणी ला सतत शेतकरी रोज समोरे जात असतो शेती जमीन हे सोन आहे त्याच बोलाव तितक कमी आहे हृदयस्पर्शी संवाद आहेत.... जमीन टिकवता आली पाहिजे ,🙏
खूप छान हृदयस्पर्शी कथा आहे आणि विकास बोराटे आणि तुमच्या टीमने केलेल्या सर्व प्रयत्नांचे खरोखर कौतुक आहे. तुम्ही अप्रतिम शॉर्ट फिल्म्स बनवत आहात याचा खूप आनंद वाटतो....हे सुरू ठेवा आणि छान संदेशांसह आणखी छान कथांची तुमच्या कडुन खुप अपेक्षा आहे.. तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा...
अतिशय वास्तववादी आणि भावस्पर्शी अशा या शॉर्ट बहिणीच्या आणि नंदेच्या शिक्षणासाठी असणारी तळमळ, मित्राने कशी ही वागणूक दिली तरी तोच मित्र संकटात सापडल्याचे समजल्यानंतर त्याला आपणच मदत केली पाहिजे ही आत्मियते ची भावना, आणि जगाचा पोशिंदा शेतकरीच आहे हे प्रत्येकाच्या मनामध्ये बिंबवणारी ही शॉर्ट फिल्म आहे. आशिष आणि विकास हे तर माझे मित्रच आहेत. त्यांनी आणि इतर कलाकार यांनी साकारलेली भूमिका अतिशय सुंदर आहे. प्रोडक्शन ला आणि सर्वांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!!🎉🎉🎉 आपलाच चिंतामणी काटवटे आणि मित्रपरिवार..🙏🇮🇳💐🌹🎊
सुंदर विषय कॅमेरा, एडीट , सवांद ,कलाकार सर्वांची काम मस्तच दिग्दर्शकाचे तर खुप खुप अभिनंदन एवढंच म्हणेल भट्टी मस्त जमली सर्व टीम चे अभिनंदन आणि शुभेच्छा❤❤❤
भावा खरंच खुप भारी विषय मांडला आहेस, काळाची गरज असणार विषय आहे, तुझे आभार व अभिनंदन कसे करू समजत नाही🙏🏻👌🏻 खरंच ग्रेट आहेस तू व तुझी टीम 👌🏻👍🏻🙏🏻👆🏻 I salute all of you 🙏🏻☺️🌱🌳💝
सर्वप्रथम ड्रीम्स ग्रुपमधील सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन ❤ शेतकरी हा अन्नदाता, तो टिकला तर आपण टिकणार हा निसर्ग नियम परंतु आपणच त्याला पायदळी तुडवतोय....... त्यात त्याची शेती ही त्याचा आत्मा..... सावकार,वकील आणि निसर्ग हे शेतीचे शत्रू. आपल्या दैनंदिन गरजा भगवण्यासाठी त्याला शेती गहाण किंवा तारण ठेवावी लागतेय... सावकार व बँकांचा शेतीवर डोळा...... शेतीचे विभाजन झाले आहे,आज जमीन गुंठेवारीवर विकली जातेय. शेतकरी अल्पभूधारक झाले आहेत... सर्वत्र शेती ऐवजी सिमेंट कॉक्रेटची जंगले उभा राहिली आहेत.... एकवेळ सगळ्या गोष्टी विकत घेता येईल पण शेती नाही... हाच सुंदर संदेश या जमीन माहितीपटातून दिला आहे.... जय जवान जय किसान...... ❤❤