कोकणी माणूस अत्यंत प्रामाणिक असून स्वाभिमानी आहे आपल्या पारंपारिक संस्कृती नेहमी जपली आहे किती नैसर्गिक संकटे आली तरी तो डगमगला नाही कोणाकडे हात पसरून मदत मागणे त्याच्या स्वभावात नाही आहे त्या परिस्थितीत नेहमी आनंदी असतो आपली लोककला तो विसरला नाही धन्य ती आमची कोकणी कष्टकरी माणसे मनापासून धन्यवाद
.......आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात आत्महत्या सुध्दा करत नाही. कोकणातील माणूस स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवतो, विपरीत परिस्थितीवर मात करण्याची कला कोकणी माणसाला अवगत आहे म्हणूनच तो सुखी आहे.
या कलेची पी एच डी करा म्हणजे कळेल संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 1966 या बाल्याणी काय केल तेव्हा तुमचं मीडिया नव्हतं आमच्या वसंशजानी खेडे अखंड महाराष्ट्र पिंजून काढला तेव्हा मुबई महाराष्ट्राला मिळाली याद राखा..! बाल्या बोलायचं नाही.
पारंपरिक गणा धाव रे बघून खुप आनंद झाला. नच मस्त बसवला आहे. Keep it up. या प्रकारच्या डान्स मधे चांगलं co-ordination लागत. तुम्ही चांगला समन्वय साधला आहे. 👌👌👏👏👏💐💐
खुप छान आहे. ह्या नाचाला जाखडी नृत्य म्हणतात. (बाल्य नाच म्हणत नाही.)नाच छान सादर केला ,अनेक गाण्याच्या गोप केलात तो तुम्ही कापडांच्या रशीतुन दाखवला.खुप छान.
मी लहानपणी मुबंईत बाल्यांचे नृत्य पाहीले आहे. ते पायात घुंगरू बांधून भन्नाट नाचायचे! गाण्यातून त्यावेळच्या परिस्थितीवर बेतलेली गाणी असायची. घराघरात गणपती असत आणि हे कोकणातले बाले संध्याकाळी नाचत घर दणाणून सोडत. यांचे नाच बघून तो गणा नक्कीच खुश होत असणार!
आमच्याकडे सुद्धा बाल्या डान्स असतो गणपतीला पण आता ती प्रथा बुडत चालली आहे. आम्ही महाड तालुक्याच्या बॉर्डर वर राहतो पण आमचा जिल्हा पुणे आहे. आम्हा घाटी लोकांवर सुद्धा कोकणचा थोडा फार प्रभाव आहे. (संदीप शिळीमकर )
भावा चिपळूणमध्ये पण असाच असतो फक्त या मध्ये यांनी मूळ पारिवाहिक पोशाख नाही घातलाय आणि यामध्ये त्यांनी स्वतःच्या स्टेप घेतल्यात. बाकी सेम आहे. तुमच्याकडे पण आणि आमच्याकडे पण...🙏🥰
@@prashanthode2984 its OK.but its true balya dance maharashtrachi shan aahe jeva college madhe festivala ha dance prakar sadar haych specially te song mala mazyaaitrinina khup aavdto .khup aahe sir ha dance song tumi tumchya kokanche ajun kahi lokgitprakar astiltar dakhva lokana tya goshtichi mahiti mele.me jastach bolteany way don't say thanku