@@user-lf4dg6co9j जय देव जय देव जय आत्मारामा । निगमागम शोधिता न कळे गुणसीमा ॥ ध्रु० ॥ नाना देही देव एक विराजे । नाना नाटक लीला सुंदर रूप साजे ॥ नाना तीर्थी क्षेत्री अभिनव गति माजे । अगाध महिमा पिंडब्रह्मांडी गाजे । जय देव० ॥ १ ॥ बहुरूपी बहुगुणी बहुता काळाचा । हरिहर ब्रह्मादिक देव सकळांचा ॥ युगानुयुगी आत्मराम आमुचा । दास म्हणे महिमा न बोलवे वाचा । जय देव० ॥ २ ॥