#BolBhidu #SharadPawar #MaharashtraBJP
अगदी महिनाभरापूर्वीच्या बातम्या होत्या. शरद पवारांनी कसं भाजप आणि अजित पवारांवर डाव टाकण्यास सुरुवात केलीय. शरद पवार कसं टप्प्यात कार्यक्रम करतात. भाजपच्या नाराजांची फौज शरद पवार गटाकडे कशी जातेय. या बातम्यांची सुरुवात झाली होती कागलच्या गैबी चौकातून. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला भाजप नेते समरजीत घाटगे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश केला होता. यावेळी बोलताना समरजीत घाटगे म्हणाले होते की, 100 टक्के परिवर्तन होणार आणि पक्षात आणखीन लोकांचा प्रवेश होणार. समरजीत घाटगे यांच्या पक्षप्रवेशाची धूळ खाली बसते ना बसते तोपर्यंत इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांनी शरद पवार गटात प्रवेश केला. याच सभेत बोलताना शरद पवार म्हणाले होते की, “मी जास्त काही बोलत नाही. चित्र बदलतंय. पुढचा महिनाभर जवळपास सगळे दिवस बुक झाले आहेत. लोकांच्या मनात हा विचार आहे की एकत्र आलं पाहिजे.
परिवर्तन झालं पाहिजे”. इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशानंतर शरद पवार फलटणला पक्षप्रवेशाला गेले. पण तिथ शरद पवारांना जो माणूस हवा होता, त्या रामराजे निंबाळकरांनी शरद पवार गटात प्रवेश केला नाही. त्यांचे निकटवर्तीय आमदार दीपक चव्हाणांनी शरद पवार गटात प्रवेश केला. फलटणनंतर शरद पवार गटात पंढरपुरचे परिचारक, मावळचे भेगडे इ. मंडळी पक्षप्रवेश करतील अशा चर्चा होत्या. पण त्यांचा काही पक्षप्रवेश झाला नाही. कारण भाजपच्या नाराज मंडळींचे नाराजी दूर करण्यास भाजपला आलेले यश. पण अशी कोणती माणसं होती जी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करतील अस बोललं जातं होतं पण ते शेवटपर्यंत शरद पवारांच्या हाताला घावली नाहीत पाहुयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
31 окт 2024