Тёмный

Ratnagiri Shimga Utsav 2018 .. Holi Festival : श्री देव भैरी शिमगा उत्सव . 

Saurabh Kotawadekar
Подписаться 50
Просмотров 9 тыс.
50% 1

#हुरा रे हुरा नी आमच्या भैरी बुवाचा सोन्याचा तुरा रे होली होsss🚩🚩
रत्नागिरी 2018.
#जय भैरी 🚩🚩🚩🚩
रत्नागिरी शहराला आज काळाच्या ओघात नव रुप आलं असलं, तरी कोकणातील ग्रामदैवत इथल्या प्रत्येक रत्नागिरीकरांसाठी श्रध्दास्थान असतं. रत्नागिरीच श्री देव भैरी हे त्यापैकीच एक ग्रामदैवत.
देवस्थानचा संपूर्ण परिसर झाडांनी वेढला आहे. मंदिराच्या दारातील पुरातन वड-पिंपळ वृक्षाचे विस्तारलेले बुंधेच मंदिराच्या पुरातनतेचे मूक साक्षीदार आहेत. मंदिराच्या आवारात पाण्याचे मोठे तलावही आहेत. . या मंदिराच्या ऐतिहासिक महत्त्वामुळे रत्नागिरी शहराच्या 12 वाड्याच नाहीत, तर शहरात येणारा प्रत्येकजण इथे नतमस्तक होतो. सहाराचं भैरीबुवा बारवाड्यावर लक्ष ठेवून असतो आणि मदतीला धावतो अशी लोकांची ठाम श्रद्धा आहे.
बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरी जोगेश्वरी, नवलाई पावणाई, तृणबिंदूकेश्वर ट्रस्टतर्फे शिमगोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. जाकीमिऱ्या येथील श्री नवलाई पावणाई, म्हसोबा व सडामिऱ्या येथील श्री नवलाई पावणाई, म्हसोबा यांच्या पालख्या श्री भैरी मंदिरात आल्या असताना दोन्ही पालख्यांची भेट मंदिराच्या आवारात झाली. दोन्ही पालख्यांच्या भेटीचा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी भक्तांनी एकच गर्दी केली होती.
शुक्रवार, २ रोजी श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरात मुरूगवाडीतील मंडळी आल्यानंतर पहाटे ३ वाजता श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरातून श्री भैरीची पालखी ग्रामप्रदक्षिणा व होळीचा शेंडा उभा करण्यासाठी बाहेर पडून झाडगाव सहाणेवरुन झाडगाव नाका, टिळक आळी, काँग्रेस भुवन, मुरलीधर मंदिर, बंदररोड मार्गे पहाटे ५ वाजता मांडवी भडंग नाका येथे आली.
पुढे प्रत्येकी एक-एक तास याप्रमाणे मांडवी, घुडेवठार, विलणकरवाडी, चवंडेवठार, खडपेवठार मागील समुद्रमार्गे जाऊन खडपेवठारातून गोडीबाव तळ्यावर सकाळी १०:३० वाजता आली. तेथून तेली आळी भागातून, राम नाका, राम मंदिर येथे दुपारी १ वाजता आली . तेथून पुढे राधाकृष्ण नाका, गोखले नाका येथे दुपारी ३ वाजता आली. तेथून पुढे लक्ष्मी चौक, झाडगावमार्गे मुरूगवाडा घसरवाट येथे राजेंद्र महादेव सुर्वे यांच्या कंपाऊंडमध्ये होळी घेण्यासाठी आली.
तेथून परत होळीचा शेंडा घेऊन दुपारी ५ वाजेपर्यत झाडगाव येथे सहाणेवर जाऊन होळी उभी करण्यात आली.

Опубликовано:

 

23 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2   
@ap9341
@ap9341 4 года назад
🙏🙏Jay Bhairy Buwa.🙏🙏
@The_FACTO_6
@The_FACTO_6 2 года назад
Bhai re op
Далее
Holi in Kadwai - Ratnagiri  कोकण
6:11
Просмотров 3,1 тыс.