@@GabbarWaldHariSingh मनाने व मनापासून गावे कसे हे त्या दोघींना कधीच सांगावे लागले नाही. असे म्हणावे की त्यांच्या गळ्यातून नोटेशन कागदावर उतरले व मग त्याचे चालीत रूपांतर केले गेले
❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍 हे गाणे इतके सुंदर मस्त आहे की तुलनाच होऊ शकत नाही 👍👍👍👍 माझ्या आईचे अत्यंत आवडते गाणे मुलींच्या जीवनात जेव्हां लग्न होऊन ती सासरी जाते तसेच आपल्या माहेरातून अगदी नविन घरी जाते तेव्हाचे तिचे एक अत्यंत हळवे मन या गाण्यात आहे असे बोल बोलते तेव्हा ते तिला सांगत असते की तुझ्या फुलाला छान सांभाळ 👍👍👍👍❤️❤️❤️ इतके छान गाणे 👍👍👍👍
Nobody can touch Lathaji’s talent! The most difficult composition in every way whether it is is the Raga or the thal. Present day music directors and the singers cannot even attempt to sing in their dreams!!!
अप्रतिम आणि मनाला आनंद देणारा हे गाणे प्रत्येकाने आपल्या बालपणापासून ऐकल असेल. दुःख मात्र या गोष्टीचा आहे ते बालपण आणि ते दिवस पुन्हा येणार नाही .काही काळापुरता तरी त्याकाळात रमलो
सावर रे, सावर रे, उंच उंच झुला सुख मला भिवविते, सांगू कसे तुला आता आभाळ भेटले रे, अंग फुलांनी पेटले रे पहा कसे ऐकू येती श्वास माझे मला फांदी झोक्याने हालते रे, वाटे स्वप्नी मी चालते रे मिटले मी माझे डोळे, हात हाती दिला जुने आधार सुटले रे, तुझ्या मिठीत मिटले रे सांभाळ तू बावरल्या, वेडया तुझ्या फुला.❤️
जीवन क्षणभंगुर आहे.अशाश्वत आहे.जीवनात येणारे सुखाचे क्षण टिपून ठेवणे व त्या आठवणींच्या शिदोरीवर जगणे हेच आपण करु शकतो.क्षण सुखाचे असोत वा दुःखाचे ते कधीच थीजवता येत नाहीत.सुख हातातून निसटून जाऊ नये ही अंतरीची अपेक्षा. अशा अनुभूतीला अक्षर करणारे हे सुंदर गीत.कवी पाडगावकर , संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी हे गीत अप्रतिम खुलवले आहे.लताजींच्या दिव्य स्वर्गीय सुमधुर सुस्वराच्या परीसस्पर्शाने हे गीत अविस्मरणीय अभिजात कलाकृती झाले आहे.धन्यवाद.
आम्ही लहान होतो पण ही गाणी आमच्या शरीरात चेतना निर्माण करीत होती आता अशी गाणी निर्माण होत नाही. होणार नाही त आता रसिक पण अखेरच्या घटका मोजत आहे असे वाटायला लागले आहे