Тёмный

Shankar Maharaj Shankar Bavani Rahul Phate शंकर बावनी ॥ हरि ॐ॥ राहुल फाटे. 

Rahul Phate Spiritual Science
Подписаться 4,6 тыс.
Просмотров 288 тыс.
50% 1

#ShankarMaharaj #ShankarBavani # Shankar Maharajशंकर बावनी
श्री शंकर बावनी म्हणजे गुरुवर्य श्री शंकर महाराजांच्या दिव्या जीवनाचे सुंदर सार. नित्य शंकर बाबांचे स्मरण, उपासना करताना प्रत्येकाच्या स्मरणात असावे , रोज एकदा तरी म्हणावे, ऐकावे असे शंकरमहाराजांचे स्तोत्र. संपूर्ण पोथी वाचणे शक्य नसल्यास केवळ शंकर बावनी रोज म्हणावी, ऐकावी.
॥ हरि ॐ॥ राहुल फाटे.
नित्य शुभंकर । नमामी शंकर ।
स्मरा श्री शंकर । गुरु महाराज ॥
॥ श्री शंकर बावनी ॥
शंकर बाबा सद्गुरु नाथा - नित्य धरा हात ।
हात जोडितो शिर टेकवितो - तव पद कमलात ॥
निशिदिनी राहो स्मरण तुझे मज - नको काही भ्रांत ।
नित्य पाठिशी उभे रहा हो - प्रार्थितो मी नित्य ॥१॥
कैलासाचे अधिपती तुम्ही - तुम्ही शंकरनाथ ।
भक्त तारण्या अंतापुरी - ये सद्गुरु नाथ ॥
व्याघ्र कोंदणी सर्प रक्षिती - शंकर साक्षात्।
चिमणाजी ते येती न्यावया - पाहुनी दृष्टांत ॥२॥
तेज:पुंज तव सद्गुरु मूर्ती - सदैव हृदयात ।
बिल्ववृक्ष छायेत प्रगटसी - सोमवार त्यात ॥
शुद्ध अष्टमी कार्तिक मासी - अवतरले नाथ ।
शिव शंकर साक्षात प्रगटला - तन्मय स्वरुपात ॥३॥
कल्याणकरा भक्ततारका - अगाध तव बात ।
सुपड्या म्हणूनी बोलविती तुला - तू शंकर श्रेष्ठ ॥
बाळलीला तव असती निराळ्या - निरंजना शांत ।
स्नान करुनी - भस्म लावूनी - अरण्यात जात ॥४॥
बालवयी वनी जाऊनी बसशी - निश्चल ध्यानस्थ ।
बिल्ववृक्ष तळी बिल्वआसनी - शिवशंकर नित्य ॥
हिंस्र पशूही तव सहवासी - सहज होती शांत ।
पशुपती शंकर अंतापूरी - कीर्तनी रमतात ॥५॥
खाय प्यायचे खेळायाचे नव्हते कधी सुचत ।
नामस्मरणी अन्भजनी कीर्तनी रमले तव चित्त ॥
अलौकिकते बालपण तुझे खेळसी परमार्थ ।
अधिकारी हा बालक प्रगटे चिन्मय स्मरणात ॥६॥
असामान्य तू अवतरलासी अंतापूर प्रांत ।
सुपड्या-शंकर-शिव अधियोगी आशुतोष शांत ॥
जनसामान्या आकळेन तव कैसे सामर्थ्य ।
बालक वृत्ती धरुनी जगसी ही जीवन रीत ॥७॥
अंतापूरचे कार्य जाहले-साधनेस निघत ।
दु:खी न व्हावे मातपित्याने हो संतती प्रांत ॥
जुळी लेकरे होती तुम्हाला शंकर म्हणतात ।
तसेच होई हीच अनुभुती चिमणाजी घेत ॥८॥
ईश्वर कार्या सिद्ध जाहसी धरिसी वेदांत ।
मातपित्यांना सांगुन निघसी ये पर प्रांतात ॥
थेट गाठला हिमालय तुम्ही तीनच कदमांत ।
बारा वर्षे तप आचरण्या शिव केदारात ॥९॥
प्रयाग संगमी स्वामी आले डुंबती तीर्थात ।
पंधरा महिने तिथे राहुनी-साधनेत मस्त ॥
तिन्ही नद्या त्या तुम्हा स्पर्शूनी पवित्र होतात ।
सर्वतीर्थी मग पायीच फिरले सकल भारतात ॥१०॥
विविध नाव तुज उपमा आणिक विविध स्वरुपात ।
गौरीशंकर मध्य प्रदेशी, सुपड्या कुणी म्हणत ।।
देविया बाबा गुजराती तू जॉन युरोपात ।
रहीम यवना, मराठ प्रांती, शंकर तुम्ही ज्ञात ॥११॥
अरबस्थानी नूर मुहोम्मद कुठे पंढरीनाथ ।
लहरीबाबा मध्यप्रदेशी टोंबो अफ्रिकेत ॥
गुरुदेव तुम्हा तामिळी म्हणती नाव विविध घेत ।
कवणा कोण्या रुपी भेटसी मज सद्गुरुनाथ ॥१२॥
भ्रमणकरुनी अक्कलकोटी स्वामी चरणात ।
अष्टभाव तो धरुनी हृद्यी स्वामी प्रणिपात ॥
अंतरहृदयी भेट जाहली सद्गुरु प्रज्ञेत ।
सोलापुरी येती सद्गुरु अपुल्या नादात ॥१३॥
जनार्दनबुवा अधिपती होते शुभराय मठात ।
मठी येऊनी शास्त्रीय गाणे-गुरु शंकर गात ॥
अलख गर्जना करुनी देसी दर्शन अद्भूत ।
जनार्दनासी दर्शन देसी गुरु दत्त रुपात ॥१४॥
जनार्दनाची भाव अवस्था उत्कट जागृत ।
भानावरती येता दिसले शंकर साक्षात ॥
शंकर महाराजास पाहूनी घालती दंडवत ।
भाव अवस्था अशीच द्या हो दर्शन साक्षात ॥१५॥
हात धरुनी महाराजा ने शुभराय मठात ।
सत्कारुनी त्या आत बसविले अंतरी भवनात ॥
अष्टसात्विका जागृत करण्या अष्टवक्र दिसत ।
बालकवृत्ती धरुनी रहासी अद्वय वेदांत ॥१६॥
धारदार अती दृष्टी दिसावी आरपार बघत ।
विपुल केश संभार मस्तकी सावळा सुमंत ॥
बोल बोबडे कळती न सकला देसी संकेत ।
आजानुबाहू समर्थापरी स्वामी शुभकांत ॥१७॥
आचरण तुझे विपरित अवघे विकृतीचा अंत ।
सकल आवडी खिचडी केली चहा नी सिगरेट ॥
राजयोगी कधी कधी दिगंबर सारे विपरीत ।
सगुण म्हणता निर्गुण दिससी निर्गुण सगुणात ॥१८॥
कर्ता तू करविताही तू अन्अनादी अंत ।
आरंभही तू विलयही तूच, तूच कृपावंत ॥
स्वामी समर्था अक्कलकोटी घाली दंडवत ।
अपूर्व ऐसे गुरु शिष्यांचे द्वय शब्दातीत ॥१९॥
चमत्कार ते असंख्य घडती धरी न कुणी हात ।
त्र्यंबकेश्वरी येत निवासी तुम्ही शिव साक्षात ॥
दृष्टी भूल ती केली अलौकिक उलगडण्या सत्य ।
निष्ठा ठेवा गुरुचरणावरी हेच अभिप्रेत ॥२०॥
कोण यवन अन्कोण इसाई नसे काही भ्रांत ।
हजरत बाबा जान पुण्याची तुम्हावरी प्रीत ॥
आई म्हणे ती तुम्हास तुम्ही अनुभूती तिज देत ।
अलख म्हणता धुनी पेटली नाथांच्या मढीत ॥२१॥
भक्तमानसी कृष्णरुपाने तुम्ही दर्शन देत ।
एकरुपता आराध्याशी कृष्ण शंकरात ॥
भक्त प्रीय ते तुम्हास म्हणती श्रीपाद साक्षात्।
जशी भावना तशा प्रीतीने तुम्ही ओतप्रोत ॥२२॥
भक्तकुणीते कीर्तन करिती विठ्ठल आळवित ।
गंधर्वही ते लीन जाहले विठ्ठल स्मरणात ॥
सद्गुरु शंकर उभे ठाकले विठ्ठल दिसे त्यांत ।
पांडुरंग तो दिसे तुम्हातच सकल मिटे भ्रांत ॥२३॥
गंधर्वाचा कंठच बसला नाटक घटी येत ।
स्वमुखातिल तो विडा घातला गंधर्व मुखात ॥
क्षणार्धात तो कंठ मोकळा गाती अभिजात ।
शिवरात्रीला नीलवर्ण तुम्ही शंकर दिसलात ॥२४॥
पाचशेर ते धान्य मागवुनी उत्सव समयात ।
हजारोही ते लोक जेवले एवढ्या शिध्यात ॥
तुळजापूरी गर्दी असता भवानी झालात ।
भवानी स्थानी दर्शन घेता शंकर बघ दिसत ॥२५॥
नाटक करता कधी सोंगाड्या कधी सर्कशीत ।
सद्गुरु म्हणती माया अवघी गुंतू नको त्यात ॥
प्लेग जाहला गाठी उठता स्वामीच स्मरणात ।
स्वामींनी त्या गाठी कापता अष्टवक्र होत ॥२६॥
मुसलमान तो खान तयाला इस्लाम समस्त ।
नमाजात ते काय सांगती हे समजावत ॥
अहंकार त्यागून अल्लाशी एकरुप होत ।
मुसलमान तो खरा म्हणावा जो अल्लारत ॥२७॥
पैगंबर उपदेश दिला तो काय खरे सत्य ।
चोरीमारी ती करू नये हे समजावती नित्य ॥
पाक हृदय ही मस्जिद आहे अल्लाही तयात ।
सहिष्णू व्हावे धैर्यन्श्रद्धा इस्लामी समस्त ॥२८॥

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 283   
Далее
Grand Final | IEM RIO 2024 | BO5 | КРNВОЙ ЭФИР
6:35:24
Shankar Maharaj Bhavani
12:30
Просмотров 189 тыс.
Shankar Maharaj Qawwali created video.
18:47
Просмотров 255 тыс.
Grand Final | IEM RIO 2024 | BO5 | КРNВОЙ ЭФИР
6:35:24