Тёмный

#Tu 

News University
Подписаться 2,9 тыс.
Просмотров 8 тыс.
50% 1

सोनी मराठी वाहिनीवर नवी मालिका.... 'तू भेटशी नव्याने'. एआयच्या माध्यमातून बहरणार हळवी प्रेमकथा!सोनी मराठी वाहिनीने आजवर अनेक चांगल्या मालिका प्रेक्षकांसाठी आणल्या आहेत. प्रेक्षकांनीही या मालिकावर भरभरून प्रेम केलं आहे. मात्र मालिका विश्वात एक वेगळे पाऊल टाकत पहिली एआय मालिका प्रेक्षकांसाठी आणली आहे. 'तू भेटशी नख्याने' या मालिकेच्या घोषणेपासूनच ही एआय मालिका नेमकी कशी असेल, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. मालिका विश्वात एआयवर आधारित असलेली ही जगभरातली पहिलीच मालिका आहे. ही मालिका वे त्या ८ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीचर रोज रात्री ९.००ना. आपल्या भेटीला येणार आहे. मालिकेचे दिग्दर्शक आणि निमति अजय मयेकर आहेत.पहिलं प्रेम कधीही विसरता येत नाही. त्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात कायम असतात. याच आठवणींचा हळवा बंध घेऊन माही आणि गौरी या दोधांची प्रेमकथा बहरणार आहे. प्रत्येकाला पुन्हा प्रेमात पाडणारी ही नवीकोरी गोष्ट दोन काळातल्या वेगळ्या शैलीत दिसणार आहे,या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता सुबोध भावे छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. त्याच्या जोडीला अभिनेत्री शिवानी सोनार प्रमुख भूमिका साकारणार आहे. सुबोध भावे हा अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक. चित्रपट व मालिका यांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिकांचं नेहमीच कौतुक झाल्याच पाहायला मिळालं आहे. एखादी व्यक्तिरेखा अविस्मरणीय कशी करायची, हे या अभिनेत्याने वेळोवेळी दाखवून दिलं आहे. त्याची प्रत्येक मालिका खास आहे. अभिनेत्री शिवानी सोनार ही मालिकेतला चर्चेतला चेहरा आहे.वेगवेगळ्या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला हा चेहरा आता 'तू भेटशी नव्याने' या मालिकेत खास अंदाजात दिसणार आहे 'तू भेटशी नव्याने' ह्या मालिकेच्या माध्यमातून एका नव्या प्रयोगासाठी ही जोडी सज्ज झाली आहे.'तू भेटशी नव्याने' या मालिकेत सुबोध भावे हा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. मात्र, या दोन्ही व्यक्तीरेखांच्या वयामध्ये जवळपास २०-२५ वर्षाचे अंतर असणार आहे. या मालिकेतला सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांचं वेगळं दिसणं सध्या चर्चेत आहे. यात अभिमन्यू या कॉलेज प्रोफेसरच्या भूमिकेत सुबोध आणि तरुण माहीच्या भूमिकेतही तोच दिसणार आहे. तन्वी या भूमिकेत शिवानी गौरी दिसणार आहे. 'तू भेटशी नव्याने' मालिकेच्या निमित्ताने दोन वेगळ्या काळांतल्या भूमिका आणि नव्वदीच्या काळातील आठवणी पहिल्यांदाच अनुभवायला मिळणार आहेत. एआयचा वापर करून ह्या मालिकेतल्या व्यक्तिरेखा साकारल्याजाणार आहेत.या नव्या प्रगोगाचा एक भाग म्हणून आणि मालिकेच्या जाहिरातीकरता एक भन्नाट कल्पनाही लढवली होती. ६ मे १९९१ रोजी सुबोधने त्याची पत्नी मंजिरी हिला प्रपोज केले होते. अभिनेत्याच्या आयुष्यातल्या या गोड क्षणानिमित्त त्याने ६ मे २०२४ रोजी एक व्हिडिओ शेअर केला. त्याने त्या क्षणी नेमकं काय घडलं होतं, हे अत्यंत आगळ्यावेगळ्या शैलीत सांगितल. या व्हिडिओमध्ये ३३ वर्षांपूर्वीचा सुबोध दिसला, मात्र त्यासाठी कोणताही जुना फोटो किवा व्हिडिओ वापरला नव्हता, तर एआयचा वापर करून सुबोधने ही किमया साधली. तर मालिका सुरू होण्यापूर्वी शिवानीने सुबोध भावे याला त्याच्या मालिका-चित्रपटांची आठवण करून देणारी एक खास फ्रेम भेट म्हणून दिली."नातं जपण्यासाठी मोबत हवी असते फक्त निरंतर प्रेमाची! कारण, जगायला वासाची नाही तर, प्रेमाची गरज असते!" "तू भेटशी नव्याने' या शीर्षकाप्रमाणेच नव्या रूपात नव्या वळणार होणारी ही भेट नेमकी कशी असेल? या प्रेमकथेचे रंग कसे बहरणार? हे सर्व अनुभवण्यासाठी येत्या ८ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर रोज रात्री ९.०० वा. प्रसारित होणारी तू भेटशी नव्याने ही मालिका नक्की पाहा,

Опубликовано:

 

26 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 8   
@RekhaBAFANA
@RekhaBAFANA День назад
मलिका दिसत नाही तरी कधी पासून सुरू होणार
@pramilasomkure8852
@pramilasomkure8852 28 дней назад
Khup khup shubhechha navin serial karita Subodh bhàvenna punñha TV war baghayla khup aawadel Tula pahte re ❤️💯👌👍
@muktaharne4265
@muktaharne4265 21 час назад
आदल्या दिवशी झालेला भाग पुन्हा दुसऱ्या दिवशी दाखवा प्लीज
@narayanipadiyar570
@narayanipadiyar570 14 дней назад
Khup chan serial ❤❤👍👍👌👌
@aartihanamsagar4686
@aartihanamsagar4686 14 дней назад
Khup Chan Serial
@SudhirMore-f3o
@SudhirMore-f3o 21 день назад
खूप खूप शुभेच्छा
@sunitapagare368
@sunitapagare368 14 дней назад
लोक बघतात का ही मालीका😊
@anitabhosale2910
@anitabhosale2910 21 день назад
खूप खूप खूप खूप मनापासून शुभेच्छा.
Далее
ЭТОТ ПЕНЁК ИЗ PLANTS VS ZOMBIES - ИМБА!
00:48
Документы для озокомления😂
00:24