विराट कोहलीच्या अनुपस्थितीत नव्या खेळाडूंसह ऑस्ट्रेलियाविरुद्धची बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकून दिल्याने अजिंक्य रहाणेलाच टेस्ट टीमचा कर्णधार करावं असा सूर सोशल मीडियात उमटू लागला आहे. विराट कोहली कर्णधार आणि अजिंक्य रहाणे उपकर्णधार अशी संरचना गेली अनेक वर्ष आहे. कर्णधार दुखापत किंवा अन्य कारणांमुळे खेळू शकला नाही तर उपकर्णधाराकडे नेतृत्व सोपवण्यात येतं. कोहली आणि रहाणेच्या स्वभावात प्रचंड फरक आहे. विराट आक्रमक स्वरुपाचा आहे तर अजिंक्य शांत आहे. मात्र दोघंही आपापलं काम जाणतात.
लेखन व संशोधन - पराग फाटक
सादरीकरण - गुलशन वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर
#Ajinkyarahane #IndiavsAustralia #Brisbanetest
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
14 окт 2024