🌾 आनंदमळा नैसर्गिक शेती व कृषीपर्यटन🌾 पुणे व पिंपरी चिंचवड पासून फक्त ३० मिनीटांवर वसलेले आनंदमळा आपलं गाव हे पर्यटन स्थळ आपल्याला नैसर्गिक शेती व ग्रामीण संस्कृतीचा परीपुर्ण अनुभव देते. वाघोले कुटुंबाने नैसर्गिक शेतीचा ध्यास घेऊन पुण्यातील सदाशिव पेठेतुन थेट मावळातील दारुंब्रे या आपल्या मुळ गावी ६ वर्षांपुर्वी स्थलांतर केले व शेतीत रमुन स्वर्ग फुलविला. ह्या सुंदर निसर्गाचा आनंद शहरातील लोकांना घेता यावा यासाठी ४ वर्षांपुर्वी आनंदमळा कृषीपर्यटनाची स्थापना झाली. आनंदमळ्यातील नैसर्गिक शेतीचा व ग्रामीण संस्कृतीचा अनुभव , चुलीवरील गावरान जेवण व गावच्या माणसांच्या आपुलकीने मिळाणारा आपल्या गावचा अनुभव यामुळे शहरातील लोकांनी आनंदमळ्याला भरभरुन प्रतिसाद दिला. आनंदमळ्याच्या या निसर्गसौंदर्याची झलक आपणांपर्यंत पोहचविण्यासाठी हा एक प्रयत्न. आनंदमळ्यातील अमर्याद निसर्गाचा आनंद घेण्यासाठी व आपल्या माणसांचा गोडवा अनुभवायला आनंदमळ्याला एकदातरी भेट द्यायलाच हवी 🙏🏻.
🌾 आनंदमळा नैसर्गिक शेती व कृषीपर्यटन🌾 समीर भरत वाघोले गाव: दारुंब्रे ता: मावळ संपर्क:९९२२७७७८९९ Email: wagholesameer82@gmail.com
मनमोहक निसर्ग, संस्कृती, पर्यावरण पूरक पर्यटन, अस्सल ऑरगॅनिक महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती touching mind , body & soul, दिवाळी पर्यटणासाठी पुण्यातील सर्वोत्तम कृषी पर्यटन स्थळ. Keep it up. My best wishes.👌👍👍👍
धन्यवाद आज शाळेतील इयत्ता तिसरीच्या मुलांना कणगीचा अर्थ समजावून सांगण्यासाठी या व्हिडिओचा खूप उपयोग झाला. तुमच्या या आधीचे व्हिडिओ हेल्दी फूड च्या ग्रुप वर पाहिलेच होते. पण आज वर्गात शिकवताना मला तुमच्या या व्हिडिओचा खूप उपयोग झाला. मी शुभम ची आई, सौ.मीरा शेळके.