काकू, चण्याची कांदा लसूण विरहित उसळ रेसिपी खूपच छान आता करून पाहिन. काकू तुमच्या रिबन पकोडा रेसिपी खूपच सुंदर आहे, पण काकू त्यात तेलाचे मोहन किती घ्यावयाचे ते समजेल नाही म्हणून मेसेज पाठवला आहे प्लीज सांगा ना .
पौष्टिकतेने भरपूर असे आपले लाडू आहेत ताई. आधीच्या एका कॉमेंटनुसार कदाचित त्यात तुलनेने मेथी पूड कमी असेल परंतु अगदी कडूजार लाडू खाण्यापेक्षा असे पौष्टिक वस्तूंनी भरपूर आणि चविष्ट लाडू खाण्यात खरी मजा आहे. ताई पण आपण गुळाचे प्रमाण सांगितले नाही. म्हणजे एकूण मिश्रणाच्या किती प्रमाणात (proportion) गूळ घ्यावा हे कृपया सांगावे, जेणेकरून लाडू योग्य प्रमाणात गोड होतील आणि बांधले जातील. धन्यवाद.
स्मिता काकू ..कैरीचा मुरंबा अगदी छान दाखविला....कितीतरी दिवसापासून शिकायची इच्छा होती....तुम्ही अगदी योग्य सोप्या रीतीने दाखविता...तुम्हाला खूप खूप धन्यवाद..❤