आहा आहा रे भाई । शक्ति वेचाविया परउपकारा । खोटें खोट्याचा पसारा । सत्य तें भवनदीचा तारा । आळस तो न करा येथे अहो सांगतों ॥७॥ आहा आहा रे भाई । व्रत करा एकादशी सोमवार । कथा पूजन हरीजागर । पुण्य तें असे गातां नाचतां बहु फार । पुन्हा बोलिला संसार नाहीं नाहीं सत्यत्वें ॥८॥ आहा आहा रे भाई । संग संतांचा करितां बरवा । उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा । पंथ तो सुपंथें चालावा । उगवा वासना लिगाड ॥९॥ आहा आहा रे भाई ।