मला असे वाटते असे गाणे ऐकवावे, आणि ऐकणे ब स, मला ही गाणी माझ्या आत्मीयता किवा आत्मसात, फिट आहेत असे वाटते, जेवढे बोलले तेवढे कमीच आहे, जय भोलेनाथ जय श्रीकृष्ण
आपली आवड सारखे कार्यक्रम अर्ध्या तासाचे असायचे .परंतु चोवीस घंटे मनाला आनंद द्यायचे .तो जमाना पुन्हा येणार नाही. याचं दुःख होतंय.आज आपण कोणत ही गाणं कधीही ऐकतो .परंतु त्या आनंदाची सर कधीच येणार नाही. असं वाटतं मोबाईल ने सारेच सुख हिरावून नेले आहे .😂😂
मी इयत्ता चौथीत असताना हा चित्रपट पाहिला होता तेही दुसऱ्याच्या घरी जाऊन. हे गीत ऐकलं की तो काळ समोर येतो. आजच्या या धकाधकीच्या काळात त्या निरागस जीवनाची प्रकर्षाने आठवण येते. गीतकार यशवंत देव यांची प्रसंगानुरूप दर्जेदार शब्दयोजना आणि लतादीदींचा सुमधुर आवाज सर्व काही अप्रतिम.