आरे दादा ती पोरगी मराठी बोलतय न तु का इंग्रजी फाडतस आपण आगरी कोळी लोक आपली भाषा बोलायला लाज कसली माझी पण मुलगी आणि मुलगा इंजीनियर आहेत अमेरिकेला जाऊन आलेत पण गावात आली की अस्सल आगरी बोलतात आपली मायबोली जगात भारी ❤
कोली/आगरी लोकांची हळद नुसती ऐकली आहे आजुबाजुला कार्यक्रम होत असतात पण कोणी खास मित्र नसल्यामुळे कधी हळदीला जाण्याचा योग आला नाही. आपण जो जंगी कार्यक्रम केला आहे त्याला तोड नाही. सर्वजण एकत्र येऊन काम केले की जी मजा येते ती मजा फ्लॅट मध्ये राहणाऱ्यांना कधीच मिळणार नाही.आजकाल लग्णकार्याचा इव्हेंट झाला आहे त्यात कधीच आपुलकी नसते कृत्रिमपणा असतो.