Тёмный

आठवणीतल्या कविता ❤️| एका तळ्यात होती | कवी ग दि माडगूळकर | marathipoems 

Madhura's Athwannitlyakavita
Подписаться 8 тыс.
Просмотров 14 тыс.
50% 1

कविवर्य ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेली कविता ज्या कवितेचं पूढे प्रसिध्द गाण्यात रूपांतर झालं.
आपण जेव्हा आपल्यातला प्रतिभेला ओळखतो तेव्हा आपण स्वतःच राजहंस अहित याचा प्रत्यय येतो. याचा आशयची ही कविता.
एक तळ्यात होती
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक
कोणी न तयास घेई खेळावयास संगे
सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक
पिल्लास दु:ख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी
जे ते तयास टोची दावी उगाच धाक
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक
एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले
पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळले, तो राजहंस एक
- ग. दि. माडगूळकर
#आठवणीतल्याकविता
#athwanitlyakavita
#marathipoem
#marathikavita
#balbhartikavita
#yuvakbhartikavita
#ekatalyathoti
#ashabonsle
#gadima
#gadimadgulkar
#madhuragharpuredeshpande

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 43   
@santoshlokhande7178
@santoshlokhande7178 Год назад
जय जय श्रीराम समर्थ खूप छान कविता धन्यवाद
@rameshkhandare1560
@rameshkhandare1560 2 года назад
विसरत चाललेला ह्या कविता, एकदा ऐकाव्यास वाटतात, छान, धन्यवाद.....
@suhaskalvankar1513
@suhaskalvankar1513 Год назад
छान गदिमांची कविता व आपली सुश्राव्य प्रस्तुती.
@indumatipawar9532
@indumatipawar9532 Год назад
खूप सुंदर छान. 👌👌👍
@ravindrajadhav1729
@ravindrajadhav1729 Год назад
कविता सुंदर आहेच, आपल॔ सादरीकरण आणि गायन ही छान आहे. खुप खुप शुभेच्छा !
@tarakivlekar1207
@tarakivlekar1207 2 года назад
खूप सुंदर पूर्ण भाव चेहऱ्यावर दिसतात ! ! ! छान
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 2 года назад
धन्यवाद
@ganeshrakhonde1040
@ganeshrakhonde1040 3 года назад
Khupaach छान
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 года назад
धन्यवाद 😊
@someshwar.v.sawant2069
@someshwar.v.sawant2069 Год назад
❤️❤️👌💕💕
@rajendrajoshi2920
@rajendrajoshi2920 3 года назад
Kup chan
@adityam2803
@adityam2803 2 года назад
मधुरा खुप सुंदर... ❤️
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 2 года назад
धन्यवाद 😊
@meghapanvelkar9639
@meghapanvelkar9639 Год назад
ताई खूप छान म्हटली कविता , मला पण ते गाणच वाटत होत खूप आवडते ते गाणं मला आणि तुझा आवाज पण तुझ्यासारखा गोड आहे.😘
@gayatripotdar3869
@gayatripotdar3869 2 года назад
शुभेच्छा by Pranav
@ananddeshmukh7922
@ananddeshmukh7922 Год назад
मस्त
@shitalchhangani3226
@shitalchhangani3226 2 года назад
खूप छान 👌👌👌 माझ्या वडिलांना पण ही कविता हो
@swatishringarpure8773
@swatishringarpure8773 3 года назад
अती सुंदर गायन !
@rrekhe3754
@rrekhe3754 3 года назад
त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक बेटी आवाज छान आहे तुझा शब्दांमधे औपचारिकता नसून वास्तविकता आहे भावनांच मिलन आहे आणि म्हणूनच तुझ्या कविता आणि त्यातील शब्द भाव हृदयाला स्पर्श करतात
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 года назад
खूप खूप धन्यवाद 🙏😊
@user-zk9jj1ox6o
@user-zk9jj1ox6o Год назад
यशश्री पायाची दासी आणि मोहरा इरेला पडला या कविता मिळाल्या तर दाखवा धन्यवाद या कविता आम्हाला होत्या या सर्व कविता आम्हाला होत्या
@vasudhasapate5803
@vasudhasapate5803 3 года назад
आवाज खुप गोड आहे खुप मस्त म्हणलीस हे गाण
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 2 года назад
😊🙏🏻धन्यवाद
@dattatrayalagad8846
@dattatrayalagad8846 3 года назад
Very nice and sweet
@santoshgopal8855
@santoshgopal8855 4 года назад
Khup Chan sundarrrr
@umeshnikam8939
@umeshnikam8939 3 года назад
It's very nice
@shobhashinde_2222_
@shobhashinde_2222_ 3 года назад
आपल्या कविता ऐकून काहीतरी हरवलेलं गवसलं अशी भावना होते,अनामिक आनंद होतो. आपलं सादरीकरण हे उत्कृष्ट आहे. गुगल वर बरच सर्च करूनही मला ना.गो.नांदापूरकर यांची 'माझी मराठी असे माय भाषा' ही कविता मिळालेली नाही,ती आपण सादर करावी.
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 года назад
आपण केलेल्या कौतुका साठी खुप खुप धन्यवाद 😊. माझ्या छोट्या प्रयत्न मुळे आपल्याला आनंदा झालं बस माझं काम सफल झालं. तुम्ही जी कविता म्हणतायेत ते मी नक्की सादर करीन. माझ्या कडे आहे की नाही शोधावी लागेल पण लौकरच सादर करीन. 🙏🏻
@abhijit111111
@abhijit111111 3 года назад
खूप छान 👍👍👌
@rrekhe3754
@rrekhe3754 3 года назад
बेटी मी कविता ऐकतांना एका वेगळ्याच दुनियेत असतो आनंद वाटतो शांती मिळते आठवणीतील कवितेचा खूप मोठा खजिना मिळाला बेटी तुला आणि हा खजिना इतरांना वाटत आहे त्यांना सुख शांती समाधान देत आहे
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 года назад
Dhanyawad☺️🙏. आपल्या सारख्या श्रोत्यांमुळे मला अजून छान करण्याची प्रेरणा मिळते.
@avadhootkulkarni6165
@avadhootkulkarni6165 Год назад
ताई, '"एका तळ्यात होती..." हे गीत रूपाने यू ट्यूब आणि ध्वनिमुद्रिकांच्या स्वरूपात उपलब्ध आहे. तुमच्या सादरीकरणात मला थोडा बदल सूचवावा वाटतो. तुम्ही सांगितलेली चाल चित्रपटगीताची असावी. गदिमांची मूळ कविता कोणत्या वृत्तात (बहुधा छंद किंवा मात्रावृत्त असावी) आहे हे तपासून त्या वृत्ताच्या चालीत ही कविता सादर केली तर आणखी वेगळा प्रयत्न होईल. असा प्रयोग कै. सुधीर फडक्यांनी 'सावरकर' चित्रपटात केला आहे. मंगेशकर भावंडांनी गायलेल्या "ने मजसी ने परत मातृभूमीला..." ची चाल मूळ वृत्ताची चाल नाही. सुधीर फडक्यांनी 'सावरकर' चित्रपटात हेच गीत स्वतः गाताना वापरलेली चाल मूळ वृत्ताची आहे. वृत्ताचे नाव बहुधा 'अक्रुर' असावे. (मला याक्षणी नेमके आठवत नाही आहे.) हे कोण बोलले बोला, भेटेन नऊ महिन्यांनी, ने मजसी ने परत मातृभूमीला वगैरे अनेक कविता 'अक्रूर' या एकाच वृत्तातील असाव्यात. त्या विशिष्ट चालीवर गुणगुणता येतात. तसे 'एका तळ्यात होती' चे मूळ वृत्त आणि त्याची चाल शोधायला हवी.
@sujataushirkar6371
@sujataushirkar6371 Год назад
देवमान्य कविता तिची पहिली ओळ अशी यज्ञ् शँभरावा होताच पुरता हि कविता सुद्धा बोला ना
@hemantdeshpande7737
@hemantdeshpande7737 3 года назад
Best
@pradnyakulkarni7683
@pradnyakulkarni7683 3 года назад
👌👌
@sangitakulkarni3425
@sangitakulkarni3425 3 года назад
Mast
@vijayabhave2279
@vijayabhave2279 3 года назад
बदके पिले सुरेख! तशी तुम्ही पण कविता सुरेख म्हटली आहे ! परत एकदा खूप शुभेच्छा अणि धन्यवाद !👌👌🌹🌹
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 года назад
खूप खूप धन्यवाद 😊🙏
@santoshpotdar9612
@santoshpotdar9612 4 года назад
Nice
@dagdujadhav3208
@dagdujadhav3208 4 года назад
जुन्या माझ्या आठवणीतल्या कविता मला ऐकुन फारच आनंद झाला . मी आपणास फार फार धन्यवाद देतो.
@vijayabhave2279
@vijayabhave2279 3 года назад
ही कविता एका इंग्लिश कवितेवरून केली आहे! त्या कवितेचं नाव The Ugly Duckling! ग दि माडगूळकरांनी कमाल कविता केली आहे!विनम्र अभिवादन !मधुरा तू नेहमी प्रमाणे छानम्हटलीस !👌👌🙏🙏🌹🌹
@VishalJadhav-zo8wk
@VishalJadhav-zo8wk 3 года назад
प्लीज.. सवे सेना भूपाल निघाला आहे... (सहावीला पुस्तकं साहित्य शोभा ) ही kavita मिळवा
@madhurasathwanitlyakavita
@madhurasathwanitlyakavita 3 года назад
तुम्ही माझ channel subscribe करा मगांजे तुम्हाला सगळ्या जुन्या कविता ऐकायला मिळतील. नळ राजा आणि हंस कविता पण सादर केली आहे मी. तुमच्या साठी link देते आहे. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ZA9BVVHZcTA.html
Далее
Какой звук фальшивый?
00:32
Просмотров 184 тыс.
Какой звук фальшивый?
00:32
Просмотров 184 тыс.