ग्रामीण भागाचा विकास करत असताना उच्चशिक्षित लोकांनी राजकारणात येऊन अनेक योजनांचा पाठपुरावा जर केला तर आपण अनेक समस्या सोडवू शकू .मॅडम ने तीस कोटी रुपये मंजूर करून आणतात पूर्ण रक्कम कारणी लावतात. स्वतः उभे राहून योजना पूर्ण करतात. वृक्षारोपणाचे कार्य पूर्ण करतात ही गोष्ट खूप मोठी आहे. शासनाचा जो निधी येतो तो 100% वापरला गेला तर खूप बदल घडेल. शासनाचा जो निधी मंजूर झालेला असतो त्यात स्वतःचा थोडाफार निधी टाकला आणि काम पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न केला तर अतिशय उत्कृष्ट कामे उभी राहू शकतात .इथून पुढे प्रत्येक राजकारणाने शासनाच्या निधीचा स्वतःसाठी वापर करण्याऐवजी पूर्ण निधी मंजूर योजने साठी वापरला आणि अशी वृत्ती विकसित झाली तर आपल्याला ग्रामीण भागाचा कायापालट झालेला दिसल्याशिवाय राहणार नाही.
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आणि कांग्रेस पार्टी ही नवीन तरूणांना संधी देते आणि ते आपल्या कार्यात सक्सेस पण होतात पण भाजप हे नवीन प्रतीनीधी तयार करण्याऐवजी दुसर्या पार्टीतील लोकांना धाक दाखवुन आपल्या पक्षात घेतात , अजित दादा सारखे अभ्यासु व्यक्ती आणि राजकारणातील किंग माननीय शरद पवार साहेब यांना चांगल्या उमेदवाराची पारख असते