एका दिवसात फारच सुंदर मोड आले आहे.. मी पण कडधान्ये घरी भिजवून घेते. स्प्राऊट मेकर मध्ये ठेवून त्याला मोड काढून घेते... तुमच्या पध्दतीने माझी आई कडधान्याला मोड आणायची.आईची आठवण आली... आता कसे स्प्राऊट मेकर आहे ना त्यातही अगदी असेच मोड येतात. फारच सुंदर विडीओ आहे 👍🙏
खुप छान ताई.. मी सुद्धा असंच करते..दोन तीन कडधान्य एकदाच भिजवते...जेवढे पाहिजे तेवढे भाजीला घेऊन उरलेले मोडाचे कडधान्य फ्रीज मध्ये ठेवले की घाईच्या वेळेत पटकन भाजी करता येते...
नविन किंचन...काम केलं...वाटत ताई.... खूप छान मस्त आपल्या मेहनतीच फळ...मिळालं म्हणायचे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या परिवारासोबत राहो...हिच त्यांच्या चरणी प्रार्थना 🙏🌹😊
ताई छान माहिती आपण सगळे अशीच कडधान्य करतो पण नव्या पीढिला अशी माहिती यूट्यूबवर कोणी काकू मावशी सांगतात तेव्हां खूप पटते तेव्हां आपले पारंपारिक पदार्थ आणि पद्धति यूट्यूब वर यायलाच पाहिजे छान सादरीकरण खूप खूप शुभेच्छा🎉
नक्कीच like करणार. मायलेक खूप मेहनती आहेत. मोड आणण्याची पध्दत मस्तच. तुम्ही सांगितलेली tip महत्वाची वाटली दोन तीन पाण्याने भिजवलेले कडधान्य धुतल्याने वास येत नाही बाजारातून आणलेले कडधान्याला वास येतो तुमचे बोलणे खूप आवडते
खूप छान मोड आलेत.विशेषतःचण्याना मोड यायला वेळ लागतोह्या पद्धतीने.खूपच सुंदर मोड आले आहेत.किचनमधल्या बेसिक टिप्स तुम्ही.छान देतात.भिजवलेले कडधान्य विकत घ्यायला महाग तर पडतेच आणि पाणी कुठले वापरले असते हा प्रश्नच असतो.ताई तुमचा नेहमीचा प्रसन्न हसतमुख चेहरा खूप सुंदर दिसतो.आजच्या साडीचा रंग तुमच्यावर खुलुन दिसतो. मोड आलेल्या कुळीथाची भाजी दाखवाल का?