Тёмный

एव्हरेस्ट बेस कॅम्प - एक सुंदर हिमस्वप्न भाग १ - लेखक डॉ. माधव पुराणिक - अभिवाचन श्री.विजय घमंडे 

Krishnakamal कृष्णकमळ
Подписаться 355
Просмотров 446
50% 1

एव्हरेस्ट बेस कॅम्प -एक सुंदर हिमस्वप्न
‘कृष्णकमळ’ सादर करीत आहे- डॉ माधव पुराणिक यांनी लिहिलेले प्रवासवर्णन - एव्हरेस्ट बेस कॅम्प -एक सुंदर हिमस्वप्न.
लेखकाने व त्याच्या पत्नीने, युवाशक्ती या संस्थेच्या, हिमालयातील अति उंचीवरच्या पस्तीस दिवसांच्या परिभ्रमण मोहिमेत भाग घेतला. मोहिमेची सुरवात ४५०० फुटांवरच्या काठमांडू या शहरापासून झाली. वीस हजार फूटांवरच्या एव्हरेस्ट बेस कॅम्प या ठिकाणी जाऊन परत येताना , १५७०० फूटांवरच्या गोकियो लेकच्या वेगळ्या मार्गाने, ही मोहिम काठमांडूला परतली.
हा सर्व दऱ्याखोऱ्यांतला, बर्फाळ वातावरणातला प्रवास सुंदर, चित्तथरारक व रोमांचकारी होता. हिमालयातील निसर्गसौंदर्याला लेखकाने, ऊस्फूर्त शब्दांद्वारे दिलेला, हा तरल प्रतिसाद आहे. या भव्य पार्श्वभूमीवर स्वतःच्या व इतर सहप्रवाशांच्या मनात उठणाऱ्या भावनांची आंदोलनेही, लेखकाने सहजतेने टिपली आहेत.
लेखकाने ‘आकाशामधलं, हिमशिखरांमधलं गूढ व अद्भुत’ टिपलेलं आहे.
गोरक्षेपहून लेखकाला व त्याच्या पत्नीला झालेले माउंट एवरेस्टचे दर्शन अलौकिक व अनुपम होते. हिमशिखरांच्या मालिका, हिमनद्यांच्या शेजारुन जाणाऱ्या पायवाटा, हिमवर्षावाचा रौद्रपणा व हिमस्फटिकांच्या चमकणाऱ्या प्रकाश छटा लेखकाने काव्यात्मकतेने टिपल्या आहेत.
सादर करित आहोत-
एव्हरेस्ट बेस कॅम्प- एक सुंदर हिमस्वप्न भाग १ ,
अभिवाचक -श्री. विजय घमंडे

Опубликовано:

 

2 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3   
@ashwinghamande5489
@ashwinghamande5489 21 день назад
डोळे बंद करून ऐकत राहावे. अप्रतिम सादरीकरण विलक्षण आपण जणू 1992 मध्ये आहोत असे वाटले. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@AsawariJoshi-wd3kt
@AsawariJoshi-wd3kt 19 дней назад
वा .... सुरेख, उत्कंठावर्धक वर्णन आणि त्याचं तेवढंच प्रभावी अभिवाचन ....!
@gaurideshpande9700
@gaurideshpande9700 22 дня назад
खूप सुंदर project झाला आहे हा. हिमालयीन निसर्ग आणि मानवी जीवन, आणि त्यातील ट्रेकिंगच्या निमित्ताने घेतलेला स्वतःच्या मनोव्यापारांचा मागोवा हा लेखनाचा विषय आणि त्याचं अभिवाचन हे सगळच अतिशय प्रत्ययकारी झालं आहे. लेखक आणि अभिवाचक ह्या दोघांचेही उत्तम निर्मिती बद्दल अभिनंदन! 👏👏👌
Далее
2DROTS vs RISENHAHA! КУБОК ФИФЕРОВ 2 ТУР
11:31
2DROTS vs RISENHAHA! КУБОК ФИФЕРОВ 2 ТУР
11:31