ओले बोंबील फ्राय , क्रिस्पी चटपटीत ओले बोंबील फ्राय
ओले बोंबील फ्राय करण्याची पद्धत.
* बोंबील हे अगदी ताजे असावे
* बोंबील जाड जर असतील तर मधोमध चिरा पाडाव्या
म्हणजे बोंबील पसरट होऊन बोंबील कड़क होण्यास मदत होईल.
* बोंबलातील पाणी निघण्यासाठी बोंबलाला हळद, मीठ, आणि लिंबू लावून अर्धा तास एका चाळणी मध्ये ठेवावे म्हणजे त्यातील पाणी निघून जाईल.
* अर्ध्या तासानंतर बोंबलाला
* लाल तिखट
* अद्रक, लसुन , हिरवी मिरची, आणि कोथिंबीरचं वाटण
* चाट मसाला
* धने जिरे पावडर
हे सर्व मसाले चोळावे
* तांदळाचे पीठ , बारीक रवा, आणि लाल तिखटाचं कोटिंग करा.
* तेल क** गरम झाल्यानंतर बोंबलाला पिठाचं कोटिंग करून बोंबील तळावे.
* बोंबील तळताना दोन बोंबला मध्ये अंतर ठेवायचे फुगतात आणि एकमेकांना चिकटून तुटतात.
* पहिली बाजू कडक फ्राय झाल्याशिवाय बोंबील पलटी करू नये.
4 июл 2024