Тёмный

कलशारोहण-ध्वजारोहण, उदघाटन सोहळा | पुरातन श्री  

Kalpesh Shitkar
Подписаться 1,9 тыс.
Просмотров 1,1 тыс.
50% 1

श्री हनुमान आळी खरसई - मुंबई (रजि.) आयोजित पुरातन श्री हनुमान मंदिर जिर्णोद्धार सोहळा.
रायगड जिल्ह्यात, म्हसळा तालुक्यातील खरसई या आदर्श सांप्रदायिक गावात पुर्व दिशेला पुरातन काळात स्थापन झालेला श्री हनुमान मंदिर..! या मंदिराच्या प्रारंभीचा मागोवा घेता, हिंदवी स्वराज्य अबाधित राहावे. याकरीता शुर निष्ठावंत-शौर्यशाली इतिहास घडविणारी व सुसंस्कृती जपणारी तरुण पिढी निर्माण व्हावी. त्यासाठी मन कणखर व शरीर दणकट व्हावे लागते. म्हणून स्वामिनिष्ठा व दास्यभाव यांचा आदर्श निर्माण करणारी शौर्यशाली शक्तीदेवतेची उपासना घडावी. याकरीता गावोगावी श्री मारुती मंदिरे उभारली जावीत. ही मुळ संकल्पना श्री समर्थ रामदास स्वामी यांचीच...!
श्री हनुमान आळी खरसई - मुंबई आयोजित पुरातन श्री हनुमान मंदिर जिर्णोद्धार सोहळ्याचा हा दुसरा दिवस. या दिवसाचे मुख्य कार्यक्रम म्हणजे मंदिराचा कलशारोहण - ध्वजारोहण सोहळा व उदघाटन सोहळा आणि या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती आहे परम पूज्य श्री अभयानंद स्वामी यांची. श्री अभयानंद स्वामी यांच्या शुभहस्ते मंदिराचा कलशारोहण - ध्वजारोहण करण्यात आले आणि यासाठी श्री अभयानंद स्वामी हे कोल्हापुरातील कणेरी (सिद्धगिरी) मठातून खरसई येथे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले.
स्वामीजी आणि त्यांचे शिष्य यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा आणखीनच वाढली. या मिरवणुकीला प्रचंड गर्दी आणि भक्तिमय वातावरण याने दिवसाची सुरुवात आणखीनच छान झाली. भजन, कीर्तन, हरिनाम, मिरवणूक हे आपण पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमात म्हणजेच आपल्या मागच्या विडिओ मध्ये सुद्धा पाहिले. डोक्यावर उन्हाळ्यातील कडक ऊन आणि पायाखाली या उन्हाने तापलेला रस्ता आणि त्या रस्त्यावरून विनाचप्पल मिरवणुकीत सहभागी होणारे सर्व भाविक यांचे खरोखरच कौतुक करावे तेवढे कमीच. एवढ्या उन्हात, गर्मीत कसलीच पर्वा न करता फक्त भक्तीत न्हाऊन निघालेले, दंग झालेले भाविक आजकाल कमीच बघायला मिळतात.
मंदिराच्या कळसाची पूजा ही स्वामींच्या शुभहस्ते करण्यात आली. भूतो न भविष्यती अशा या सोहळ्याचे साक्षीदार व्हावे म्हणून सर्व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. अगदी दिवसाच्या शेवटपर्यंत.
मुख्य कळसासोबतच आणखी ९ कळसांची, मंदिराच्या घंटेची आणि शिवलिंगावरील कलशाची सुद्धा पूजा करण्यात आली. पूजाविधी झाल्यानंतर या कळसांसोबत मंदिराभोवती ५ प्रदक्षिणा करण्यात आल्या. ५ प्रदक्षिणा पूर्ण झाल्या आणि स्वामी कळस घेऊन मंदिरावर आले. वर येऊन आधी पूजाविधी करण्यात आली, मग कळस लावून ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्याचे साक्षीदार व्हावे आणि हा सोहळा आपल्या दृष्टीत साठवून ठेवता यावा साठी हजारो भाविक मंदिराच्या परिसरातून हा सोहळा पाहत होते. मुख्य कळसासोबतच समोरील कळस, आणि बाकीचे ८ कळस लावण्यात आले. यानंतर मंदिरामध्ये मूर्तींची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रतिष्ठापना झाल्यानंतर श्री हनुमान आळी गाव मंडळाचे व मुंबई मंडळाचे अध्यक्ष यांच्या शुभहस्ते आणि स्वामी यांच्या उपस्थितीत मंदिराचे उद्घाटन झाले. उदघाटन झाले, स्वामींनी दर्शन घेतले आणि मंदिर लोकांना दर्शन करण्यासाठी उघडे झाले.
श्री हनुमान आळी खरसई मुंबई आयोजित पुरातन श्री हनुमान मंदिर जिर्णोद्धार सोहळ्यानिमित्त आलेल्या भाविकांसाठी व गावकऱ्यांसाठी ३ दिवस जेवणाची सोय करण्यात आली होती, तसेच या गरमी मध्ये कुणाला त्रास होऊ नये म्हणून जागोजागी थंड पाण्याचे जार ठेवण्यात आले होते.
Don't Forget to Like , Share and Comment
Subscribe Now
/ @kalpeshshitkar
Follow us on Instagram
/ kalp284
Follow us on Facebook
/ kalpesh.shitkar
Previous Vlogs
• पुरातन श्री #hanuman #...
• खरसईतील युवा मावळ्यांच...
• #girgaon ची शोभायात्रा...
• आमचे दाराशी हाय #shimg...
• #family सोबत विठूरायाच...
Thank you !
#mandir

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 6   
@deepalimhatre6783
@deepalimhatre6783 4 месяца назад
🙏🙏 mast
@kalpeshshitkar
@kalpeshshitkar 4 месяца назад
Thank you so much 😀
@kalyanishitkar3020
@kalyanishitkar3020 4 месяца назад
Nice 👌👌
@kalpeshshitkar
@kalpeshshitkar 4 месяца назад
Thanks 😊
@Rammandare_
@Rammandare_ 4 месяца назад
खूप छान वीडियो व माहिती❤🙏
@kalpeshshitkar
@kalpeshshitkar 4 месяца назад
मनापासून आभार🙏🏻 केलेल्या कार्याची कुणी दखल घेतली तर खरंच समाधान मिळतो... चुका काढणारे, असं कर तसं कर सांगणारे बरेच असतात पण कौतुक करणारे फारच कमी... म्हणून मनापासून धन्यवाद🙏🏻🙏🏻❤️😊
Далее
Неплохое начало лекции
00:51
Просмотров 135 тыс.
Please Help This Superhero! 🙏
00:48
Просмотров 5 млн