खुपच छान मस्तच ताई नेहमीप्रमाणेच सोप्या पद्धतीने रेसिपी कशी बनवायची हे सहजपणे तुम्हीच सांगू शकता हीच तर तुमची खासीयत आहे त्यामुळे रेसिपी लगेचच करून पाहिल्या शिवाय आम्हाला जमतच नाही धन्यवाद 🙏🙏🙏🌹❤️
मिक्सर मधून केलेली शेंगदाणा चटणी खूप छान सहजरीत्या करता येते मी ती एवढे दिवस खलबत्त्यात करत होते मिक्सरची ट्रिक खूप छान शेंगदाणे साफ करायची ट्रिक पण एक नंबर बढीया❤ एकंदरीत या चटणीसाठी थँक्यू थँक्यू सो मच❤❤
ही कुरकुरीत खमंग शेंगदाणा चटणी मला खूप आवडते. माझी पद्धत थोडी वेगळी आहे. पण मी आता तुझ्या पध्दतीने चटणी बनवून बघते. खूप छान आहे बघूनच खाण्याचा मोह होतो आहे सरीता 😊 धन्यवाद 🙏
खूप छान, ताई मला ही चटणी फार आवडते, अशाप्रकारची चटणी करायला मला जमत नाही म्हणून मी बाहेरून विकत आणते पण आज तुम्ही खूप छान प्रकारे ही चटणी दाखवलीत तुमचे मनापासून धन्यवाद, मी ही चटणी नक्की करून पाहीन, अश्याच वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या दाखवाना
माझी फेवरेट चटणी आहे. माझे माहेर सोलापूर जवळ मोहोळ येथे आहे. पुणे सोलापूर हायवे म्हणजे सोलापूर जवळ लां बोटी हे गाव आहे तिथले . ही शेंगा चटणी आणि लांबोटी चिवडा हा मक्याचा असतो खूप छान लागतो भाजी नसली तरी चालेल शेंगाची चटणी आणि भाकरी खूप छान लागते
मी पण याच पद्धतीने बनवते पण मी चटणी उखळात बारीक करते त्यामुळे चटणीला तेल सुटते आणि चवीला अतिशय सुंदर होते. माझ्या मुलांना अशा पद्धतीने बनवलेली चटणी खूप आवडते.