चमचमणारं पाणी. नारळी-पोफळीच्या बागा. मधोमध भुई... आणि चारी दिशांना पाणी... पाणी... आणि पाणी.
पाणखोल जूवा बेट मालवण तालुक्यातील हडी या गावातील बेट. या गावात 22 घरे आहेत आणि साधारण शंभर लोक राहत असतील. या गावात पहिली ते पाचवी शाळा आहे.
या व्हिडिओ मध्ये आपण जुवा बेट वरील लोकांचे राहणीमान त्यांचे घरे आणि तिथल्या लोकांबरोबर गप्पा सुध्दा मारणार आहोत.
तर व्हिडिओ संपूर्ण पाहा.
शांतता अनुभवायची असेल... तर इथं या... माणसांच्या गोंगाटापासून... वाहनांच्या वेगापासून... आणि भौतिक सुखाच्या खुळचट कल्पनांपासून दूर असलेल्या या बेटाच्या तुम्ही प्रेमात पडाल.
10 окт 2024