खान्देशी कढी आणि फुनके.....
साहित्य.....
हरभरा डाळ - 1 कप
मूग डाळ - 1/2 कप
हिरवी मिरची 5-6
जिर - 1 चमचा
आल
लसणाच्या पाकळ्या 10-12
धने पावडर - 1 चमचा
हळद - 1/4 चमचा
कांदा
कोथिंबीर
मीठ
दही - 1 कप
ज्वारीचे पीठ - 2 चमचा
बेसन पीठ - 2 चमचा
तेल
जिर - 1/2 चमचा
मोहरी - 1/2 चमचा
कढीपत्ता
लवंग - 4
दालचिनी
आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट
पाणी
______________________________
कृती-
1 कप हरभरा डाळ, 1/2 कप मूग डाळ 5-6 तास भिजण्यासाठी ठेवा . डाळ भिजल्यावर दोनदा स्वच्छ धुऊन घ्या . बाऊलमध्ये भिजलेली हरभरा डाळ,मुग डाळ, हिरवी मिरची 5-6, जिर 1 चमचा, आल्याचा तुकडा, लसणाच्या पाकळ्या 10-12 ,धने पावडर 1 चमचा, हळद 1/4 चमचा टाका व मिक्सरला बारीक करून घ्या. वाटलेल्या मिश्रणामध्ये 2 बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाका व एकत्र मिक्स करून घ्या. तयार मिश्रणाचे गोल आणि उभे मुटके तयार करून घ्या. तयार केलेले मुटके स्टीमर मध्ये ठेवा व 8-10 मिनिट स्टीम करून घ्या .
आता बाऊलमध्ये 1 कप दही आणि पाणी टाका व एकत्र मिक्स करून घ्या. बाऊलमध्ये 2 चमचा ज्वारीचे पीठ आणि 2 चमचा बेसन पीठ टाका व एकत्र मिक्स करून घ्या. अशा पद्धतीने आपला ताक तयार होतो . कढीसाठी कढईमध्ये तेल टाका व गरम करून घ्या . तेल गरम झाल्यावर कढईमध्ये 1/2 चमचा जिर, 1/2 चमचा मोहरी, कढीपत्ता, लवंग 4 दालचिनीचा तुकडा, आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट टाका व परतून घ्या . मिरची परतल्यावर कढईमध्ये तयार केलेले ताक, गरजेनुसार पाणी आणि चवीनुसार मीठ टाका व ताकाला उकळी आणा . चार ते पाच मिनिट उकळून द्या . आपली कढी खाण्यासाठी तयार.
_____________________________________
English
Ingredients
Gram dal - 1 cup
Moong dal - 1/2 cup
Green chillies 5-6
Cumin seeds - 1 tbsp
Cinnamon
Garlic cloves 10-12
Coriander powder - 1 tbsp
Turmeric - 1/4 tsp
Onion
Coriander
Salt
Yogurt - 1 cup
Sorghum flour - 2 tbsp
Gram flour - 2 tbsp
Oil
Cumin - 1/2 tbsp
Mustard - 1/2 tsp
curry leaves
cloves - 4
cinnamon
ginger garlic green chili paste
water
______________________________
Recipe-
Wash 1 cup gram dal, 1/2 cup moong dal and soak it for 5-6 hours. Wash the dal twice after soaking. Add soaked gram dal, mung dal, green chillies 5-6, cumin seeds 1 spoon, ginger piece, garlic cloves 10-12, coriander powder 1 spoon, turmeric 1/4 spoon in a bowl and grind it in a mixer. Add 2 finely chopped onions, coriander and salt to taste in the grinded mixture and mix it. Make round and vertical balls of the prepared mixture. Place the prepared mutkas in a steamer and steam for 8-10 minutes.
Now add 1 cup of curd and water in a bowl and mix it nicely . Add 2 spoons of Sorghum flour and 2 spoons of gram flour in a bowl and mix together. In this way our buttermilk is prepared. For Kadhi, put oil in a pan and heat it. Once the oil is hot, add 1/2 teaspoon cumin seeds, 1/2 teaspoon mustard seeds, curry leaves, cloves 4 ,cinnamon pieces, ginger garlic green chili paste and saute it. When the chillies are cooked, add prepared buttermilk, water as required and salt to taste in a pan and bring the buttermilk to a boil. Boil for four to five minutes. Ready to eat your curry.
__________________________________
8 сен 2024