10 वर्षात रस्त्याची कामे zali आहेत ते श्रेय kaka न्चे आहे 3 महीने zalele आहे त्यानी श्रेय घेऊ नये विशाल patalala congress ticket pn dilele नव्हते दादा घराना संपवायाचा होता कांग्रेस च्याच् लोकांना विशाल patalane konti kaame केली ती sangavet रस्ते 3 महिन्यात hot nstat😂😂😂
तासगाव नगरपरिषद इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी तासगाव बायपास रिंग रोड प्रकरणावरून व्यासपीठावर काँग्रेसचे विशाल पाटील यांनी भाषणातून संजय काका पाटील यांना पहिल्यांदा डिवचले व विशाल पाटलांच्या भाषणानंतर संजय काका पाटील यांनी त्यांच्या भाषणांमधून विशाल पाटील यांना प्रत्युत्तर दिले. संजय काका पाटील यांनी प्रत्युत्तर देताच त्यांचे भाषण चालू असताना विशाल पाटील यांनी जाहीर सभेत भाषणाच्या मध्येच उभे राहून खडाजंगी सुरू केली एवढेच नाही तर व्यासपीठावरून पुढे येत काँग्रेसच्या विशाल पाटलांनी संजय काका पाटलांशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रकार करत असताना कार्यकर्ते व्यासपीठाच्या दिशेने गोळा होऊन आले.