आदरणीय गुरुदेव शंकरशास्त्री अभ्यंकर... सा.प्रणिपात. आपले आदित्य प्रतिष्ठान हाच ज्ञानसुर्य आहे.आपले एक एक प्रवचन हे सोनेरी कीरण आहे.अत्यंत अमोघ ज्ञान आपण नेमक्या शब्दात सांगता व आम्हा बध्दांना मुमुक्षु वाटेवर घेऊन जाता.आपल्या प्रवचनांची आभा.. सहस्ररश्मी आहे.आपली अमृतमय प्रासादिक वाणी,श्रुती स्मृती पुराणे व संत वाङमय यांतील गुह्य ज्ञान माऊलींच्या सह्रुदयतेने आपण आम्हाला सांगता/जोजवता आणी कृतार्थ करता.आमचे अहो भाग्य की तुम्हि आम्हाला उध्दरीत आहात.मातोश्री अपर्णाताईंची श्रीविस नाम प्रवचने ही सुंदर आहेत. आम्हि आपले सानंद ऋणी आहोत..🕉️🙏
माननीय गुरुवर्य शंकर अभ्यंकर, सप्रेम सादर नमस्कार, आपली प्रवचनं ऐकणं हा अमृतानुभव आहे. ज्ञान आणि विज्ञान आतला फरक स्वरूपानंद हा अनुभव ज्या सद्गुरूंच्या ती कृपा मिळविण्यासाठी कोणती सद्विद्या धारण केली पाहिजे हे आपल्या सर्व प्रवचनातून समजत असतं त्यासाठी कसे प्रयत्न करावेत याचं मार्गदर्शन हे अगदी सहजपणानं आपण करत असता. माझं भाग्य थोर की ही प्रवचनं मला युट्युब वर तरी ऐकायला मिळत आहेत.