मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030
कोल्हापूरला ऐतिहासिक , पारंपरिक वारश्यासोबत समृद्ध खाद्यसंसकृतीच देणं लाभलेलं आहे . कोल्हापुरी माणसात कमालीचा रांगडेपणा आणि हळवेपणा , इथला माणूस वरून कमालीचा तिखट वाटत असला तरी त्याच्या स्वभावातून तो गुळाच्या गोडव्यासारखा असतो , त्यामुळं कोल्हापुरी माणसं आपल्या मधाळ आग्रहाने झणझणीत जेवण आपल्या पावण्याच्या असं काही गळी उतरवतात की त्यांच्या डोळ्यात त्यांच्या आपुलकीने आणि मिरचीच्या ठसक्यानं पाणी आल्याशिवाय राहत नाही .
कोल्हापुरी माणूस खाण्याच्या बाबतीत जरा ऐसपैस रोजचं जेवण जरी साधं असलं तरी त्याला आमटीत तवंग लागतोच . मुळात कोल्हापुरी म्हणजे तिखटजाळ असा काही समज आहे तो मात्र इथल्या जेवणावर अन्याय करणारा आहे , कारण इथल्या जेवणासाठी थेट मिरचीची पूड वापरण्याची पद्धतच नाही . आजकाल जो काही कोल्हापुरी मसाला म्हणून चाखला जातो तोच प्रत्येक कोल्हापूरकरांच्या घरात असतो त्याला मसाला न म्हणता सर्रास चटणी म्हटलं जातं ही चटणी बनवणं आणि ती बनवताना येणारा भूक खवळायला लावणारा वास ही खरच एक अनुभवायची गोष्ट आहे . कांदा , लसूण ,आलं , कोथिंबीर आणि वेगवेगळे मसाले आणि मिरच्या वापरून ही चटणी तयार केली जाते .
आतापर्यंत आम्ही नेहमीच तुम्हाला जुने पारंपरिक पदार्थ करून दाखवलेत , आपली खाद्यसंस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे , आणि आज आम्ही आजीच्या ७० वर्ष्याच्या आणि काकूंच्या ५० वर्ष्याच्या अनुभवातून आम्ही तुमच्यासाठी आपल्या घरच्या डंकावर कुटलेला पारंपरिक कांदा लसूण मसाला घेऊन आलो आहे , कोल्हापुरी चटणी \ कोल्हापुरी कांदा लसूण मसाला \ सातारी कांदा लसूण मसाला \ सोलापुरी काळं तिखट असे वेगवेगळे मसाले तुम्ही जरी खात असला तरी आमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तुम्हाला नक्की आवडेल , कांदा लसूण मसाला बनवताना कोणती मिरची वापरावी न्हणजे मसाल्याला रंग छान यईल , मसाल्यांचे प्रमाण कसे घ्यावे , मसाले कसे भाजावेत या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी विचारात घेऊन हा कांदा लसूण मसाला बनवला आहे.
हा मसाला आपण कुणाकडूनही करून न घेता आपल्या घरातील डंकावर बनवला आहे , डंक घरातच असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळी ताजाच मसाला मिळेल .
आम्ही आशा करतो की आतापर्यंत आम्ही जी चव जपली आहे तीच चव तुमच्या स्वयंपाकघरात येऊ दे , धन्यवाद .
मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (RU-vid) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
#gavranekkharichav #kandalasunmasala #village_food #village_cooking
#village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#maharashtrianrecipe #chulivaril_jevan
21 окт 2024