कीर्तन हा प्रकार मला पूर्वी फार कंटाळवाणा वाटत असे. पूर्व रंग व उत्तर रंग काही समजायचे नाही व डोळे केंव्हाच मिटून जात. पण गुरुवर्य आफळे यांची कीर्तने ऐकून ऐकून मला गोडी वाटायला लागली. खूप अभ्यास, सुंदर व गोड आवाज, शास्त्रीय संगीताची बैठक, पूर्ण प्रोफेशनल, कथेचे नेटके विवेचन. आता माझा कीर्तनाचे पहाण्याचा व ऐकण्याचा दृष्टीकोन पूर्ण बदलला. धन्यवाद व देवाचे मिळालेले वरदान असेच प्रवाहीत होत राहो व ऐकणाऱ्यांना आनंद दे राहो.
बुवांची विषय मान्डण्याची हातोटी लक्षणीय आहे. कथानक कसे सुरस असावे,आणि त्यातील नेमक्या आशयाने भक्तगणान्च अंत:करण कस भेदाव ही कला श्रीगुरु बुवान्च्या सर्वांगात आहे. श्रीराम ।
श्री गुरुवर्य चारुदत्त आफळे महाराज, अॅक्र राष्ट्रीय संत आहेत, यांचे कीर्तन राष्ट्रजागृती करते आणि थोर राष्ट्रीय संतांची ओळख व कार्य आम्हा पर्यंत पोहोचवतात...... आपणास चरण स्पर्श धन्यवाद
बुवा नमस्कार!आपण गात असताना आपला स्वर ह्रदयाला भिडतो.आपलं कीर्तन संपूच नये असं वाटतं..आपलं कीर्तन म्हणजे खर्या अर्थानी *गाऊ कीर्तनाचे रंगी ,ज्ञानदीप लावू जगी* असंच आहे.