किल्ले चावंड म्हणजेच प्रसन्नगड हा जुन्नर तालुक्यात असून हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारामध्ये मोडतो. किल्ल्याची उंची ३४०५ फूट असून किल्ल्याची चढाई सोपी आहे. या किल्ल्याचा इतिहास प्राचीन असून जवळच असलेल्या नाणे घाटावर होणाऱ्या व्यापारी वाहतुकीवर नियंत्रण ठेवन्यासाठी या किल्ल्याची निर्मिती झाली असावी असे म्हटले जाते. किल्ल्याचे नाव हे चामुंडा देवीच्या अपभ्रंशातून आले आहे असं म्हणतात.
याच किल्ल्यावर जाण्याचा योग आम्हाला मिळाला... चला तर मग किल्ला नजरेखालून घालू आणि थोडक्यात इतिहास पण जाणून घेऊ.
26 апр 2024