Тёмный

#जगाला 

SUPREME MARATHI NEWS NETWORK
Подписаться 354
Просмотров 74
50% 1

#जगाला शांततेचा संदेश देणारे | भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा जगात जल्लोषात साजरी..
महाराष्ट्र प्रतिनिधी: वैषाख पौर्णिमा लुंबीनी वनात इ.स.पुर्व 563 साली, शुक्रवार दिनी, विशाखा नक्षत्री,वैषाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. तो जयंतीदिन बौद्धजगतात अत्यंत पवित्र असा मानला जातो.याच वैषाख पौर्णिमेस सिद्धार्थ गौतमास गया येथे पिंपळवृक्षाखाली 4 आठवडे चार पाय-यांनी चिंतन - मनन केल्यामुळे ज्ञानप्राप्ती होऊन ते सम्यकसंम्बुद्धत्व मिळवु शकले.आणि वयाच्या 80 व्या वर्षी मल्लांची राजधानी असलेल्या कुशीनारा येथे शाल वृक्षाखाली महापरिनिर्वाणपदी पोहोचले.
बौद्ध धम्मात पौर्णिमेंचे महत्व :- बौद्ध धम्मात प्रत्येक पौर्णिमेला विशेष असे अनन्यसाधारण महत्व आहे.जगातील बौद्ध राष्ट्रांमध्ये पौर्णिमा श्रद्धेने पाळली जाते. वैज्ञानिक दृष्टिकोनातुन पाहिले असता पौर्णिमेला आकाशात मंद वारा वाहत असतो.चंद्राचा आकार पुर्ण वाटोळा असतो. आणि त्याचा प्रकाशही आपणाला सुखावत असतो.त्याच प्रमाणे सागराला भरती येते.भरती येणे म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीशी पौर्णिमेच्या चंद्राचा आप(आप म्हणजेच पाण्याचा) तेज,वायुआणि पृथ्वीचा सबंध येणे.त्याच प्रमाणे ज्या धातुंचे आपले शरीर बनले आहे.त्यामध्ये हे सर्व तत्वे असल्याने व आपण पृथ्वीवरच राहत असल्याने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पृथ्वीवरील प्रत्येक सजीवांचा या मध्ये अंतर्भाव होतो.या दिवशी पृथ्वीवरील गुरुत्वाकर्शण शक्तीमुळे व उपोसथ व्रताच्या आचरणाने मानवाला तसेच नैतिक व्यवस्थेला खुपच फायदा होतो.मानवाने कुशल कम्म केले तर मानवाला कुशल फळ मिळते तसेच ते कुशल फळ मिळण्यासाठी नैतिक व्यवस्थाही कुशल असावी लागते.कम्म हे नैतिक व्यवस्था राखतात.तर,कम्म हे मानवांकडुन केली जात असल्याने प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मानवांवरच हा भार सोपविला गेला आहे.तेव्हा मानव हाच केंद्रबिदु असल्याने मानवाने कुशल कम्म केले तर मानवता सुखी होईल .त्यासाठी बौद्ध धम्मातील मध्यम मार्गाने धम्माचरण करणे तितकेच गरजेचे आहे. पौर्णिमेच्या दिवशी त्रिरत्न वंदना,त्रिशरण-पंचशिल इ.ग्रहण केले जाते.उपोसथ व्रत पाळले जाते.या दिवशी बुद्ध विहारात जाऊन तथागतांना अगरबत्ती ,मेणबत्ती लावून ,पुष्प अर्पण करून पंचांग प्रणाम केला जातो.बौद्ध धम्मातील पवित्र ग्रंथाचे वाचन केले जाते.भंते कडुन धम्मदेसना ग्रहण करून त्यांना भोजनदान ,संपत्तीदान केले जाते. शक्य झाल्यास चिवरदान करावे ते पवित्र मानले जाते. तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणी मधिल धम्म जीवनात सिद्धार्थ गौतमाच्या जन्मापासुन महापरिनिर्वाणाच्या अंतिम क्षणापर्यंत पौर्णिमेंचाच दिवस कारणीभुत असल्याने धम्मजीवनात बौद्ध उपासक -उपासिकांना पौर्णिमेचे महत्व अपरंपार आणि अपुर्व असेच आहे.पौर्णिमा म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या मध्यावर असणारा शुक्र पक्षिय पंधरावा दिवस होय.या दिवशी चंद्रमा पुर्ण गोलाकार व प्रकाशमान असतो.पौर्णिमेचा चंद्र म्हणजे प्रसन्न जागृत परिपुर्ण जीवनाचे एक प्रतिक म्हणुन मानले गेले आहे.सत्कार्य पार पाडण्यासाठी बौद्धजीवन प्रणालीमध्ये पौर्णिमा हा दिवस पवित्र दिन म्हणुन मानला गेला आहे.पुर्ण चंद्राचा प्रकाश स्पश्ट व शीतल असतोच,परंतु शांत व आल्हाददायकही असतो.चंद्र प्रकाशाने शरिराला दाह होत नाही.उलट तो सुखकारक व मन उल्हासित करणाराच असतो. पौर्णिमेला जे पवित्र व मोठेपण प्राप्त झाले आहे.त्यामागे अनेक महत्वपुर्ण प्रसंगाचा इतिहास आहे. तो म्हणजे भगवान बुद्धांचे संपुर्ण जीवनचरित्र होय.पौर्णिमेचे महत्व निसर्गनिर्मित वातावरणामुळे सिद्ध होते.हवा गतीमान होते.सुर्य व चंद्र यांच्या प्रकाशाचा अन् उष्णतेचा लाभ अविरत 36 तास पृथ्वीवरील जीवसृष्टीला मिळतो.त्यामुळे जीवसृष्टीतील एक प्रकारचे उबदार,उत्तेजीत वातावरण मानवी जीवनाला,प्राणिमात्राला पोशक असते पृथ्वी,आप,तेज व वायु या निसर्गाच्या घटकांचा लाभ प्राणिमात्राला उपकारक असल्यानेच प्रज्ञावंत तथागत, जगतगुरू भगवान बुद्ध हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उदात्त शिकवणीमुळेच आपणास लाभले आहेततथागतांचा जन्म,गृहत्याग,तपष्चर्या, ज्ञानप्राप्ती,धम्मप्रचार -प्रसार आणि शेवटी महापरिनिर्वाण पौर्णिमेस घडल्यामुळेच प्रत्येक पौर्णिमा अत्यंत पवित्र मानली जाते.वर्षातील एकूण 12 पौर्णिमेंचे महत्व खालिल प्रमाणे आहे.
बौद्ध धर्माचे अनुयायी बुद्ध पौर्णिमेला गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानदिन आणि महापरिनिर्वाण दिन एकत्र साजरा करतात. या दिवशी भारत, तिबेट, मंगोलियासह अनेक देशांमध्ये अनेक ठिकाणी भव्य कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. बुद्ध हे नाव नसून एक उपाधी- भगवान बुद्धांच्या शिकवणीचा स्वीकार करून मोठ्या संख्येनं लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला.
जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. मात्र, वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्‍त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.
#Comments #Like #Subscribe #Share #RU-vid_Viral #RU-vid #RU-vidviral
#Boudha #Boudha_Poornima #Lordbuddha #Boudha #BoudhaBirth
‪@SUPREMEMARATHINEWSNETWORK‬

Опубликовано:

 

17 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
Buddham Saranam Gachchami Chant
35:23
Просмотров 9 млн