Тёмный

#जैविक_खेती 

Siddheshwar Shinde
Подписаться 834
Просмотров 99
50% 1

.
🪴रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे बिघडला पोत : उत्पादनात होतेय घट.
🌾डिजिटल शेतकरी🌾
माती हीच शेतकऱ्याची खरी संपत्ती
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
अलीकडे रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडला आहे. यामुळे उत्पादनात घट होत असून शेतजमिनीतून कोणतेही पीक उत्तम प्रकारे घ्यायचे असेल, तर सुपीकता आवश्यक आहे. ही सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी बायोफिट जैविक खतांचा डोस महत्त्वाचा असल्याची माहिती कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे. सुपीकतेसाठी महत्त्वाचे असलेले नैसर्गिक अन्नघटक पिकास नैसर्गिकरीत्या मिळतात.
शेतजमिनीच्या एक ग्रॅम मातीत दोन कोटी ४० लाखांपेक्षा जास्त जीवाणू व ते १३० प्रकारचे असतात. ज्या जमिनीचा सामू ६.५, तसेच सेंद्रिय कर्बाची पातळी ०.८ च्या पुढे आहे, अशी शेती सुपीक मानली जाते. मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावी लागतात. पिकास अन्नघटक जसेच्या तसे जमिनीत देण्याचे काम जीवाणू करतात. या जीवणूंची संख्या व कार्यक्षमताही अत्यंत महत्त्वाची असते. नत्र स्थिर करणाऱ्या सहजीवी जैविक गटात रायझोबियमचा समावेश होतो, तर असहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणाऱ्या गटात अझेटोबॅक्टर, अझोस्पीरीलम, असिटोबॅक्टर यांचा समावेश होतो, याशिवाय अन्य प्रकारची खतेही असतात.
🔹मुख्य अन्नद्रव्ये
मुख्य अन्नद्रव्यांमध्ये नत्र, स्फुरद, पालाश आदींचा समावेश होतो. ही अन्नद्रव्ये जास्त पुरवावी लागतात.
🔹कोणती आहेत जैविक खते?
■ पिकांची पातळी वाढविण्यासाठी जैविक कर्ब द्यावा लागतो, जैविक कर्ब हा सेंद्रिय खतातून मिळतो. जीवामृत, वेस्ट डी कंपोझर, हामिक, ॲझो, रायओ, पीएसबी केएसबी अर्शी जैविक खते व हिरवळीची खते कमी खर्चात पिकाला देता येतात.
■ जैविक खते किवा जीवाणूमुळेच शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळू शकते. जमिनीत जिवाणू नसतील, तर कितीही रासायनिक खते दिली, तरी उत्पन्न कमी मिळते.
🔹सूक्ष्म अन्नद्रव्ये
सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये फेरस-लोह, झिंक जस्त, कॉपर-तांबे, मॅगनीज, मोलाब्द (मॉलेब्डेनम), बोरॉन, निकेल आदींचा समावेश आहे. सूक्ष्म अन्नद्रव्ये मुख्य आणि दुय्यम अन्नद्रव्यांच्या मानाने कमी किंवा अतिसूक्ष्म प्रमाणात आवश्यक असतात.
🔹नैसर्गिक अन्नघटक
नैसर्गिक अन्नघटकात कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन (प्राणवायू) आदींचा समावेश आहे. हे घटक नैसर्गिकरीत्या हवा, पाणी, सूर्यप्रकाश यांपासून मिळतात.
🔹दुय्यम अन्नद्रव्ये
दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक आदींचा समावेश होतो. ही अन्नद्रव्ये मुख्य अन्नद्रव्यांच्या मानाने कमी प्रमाणात पुरवावी लागतात.
बायोफिट सुपरहिट
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
भारतीय शेतकऱ्यांच्या 24 वर्षाचा विश्वासनीय ब्रँड म्हणजेच बायोफिट
टिकेल माती तरच कराल शेती
अधिक माहिती संपर्क
श्री सिद्धेश्वर शिंदे
( कृषी सल्लागार)
मोबाईल नंबर : 9881220287

Опубликовано:

 

20 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее