Vishal Ji ya varshi mi Rasi 3499 biyane vaprale ahe ani ekri 71.039 Qtl makka yield gheun Maharashtra State madhe 1st alo ahe ter iter biyene peksha mala 3499 pasun khup changal utpadan ale ahe ter te hi shetkari bandhuni vaprun pahave. Dhanywad
अधिक उत्पादन तंत्रज्ञानाचा संक्षिप्त तपशिल (SOP) शेतक-याचे माहिती १. शेतक-याचे नाव - श्री. रमेश संभाजी खंडागळे 9096261295 शेतकरी वापरत असलेले तंत्रज्ञान - १. पिकाचे नाव - खरीप मका २. जमिनीची पुर्वमशागत - १ खोलवर नांगरणी, २ कुळवणी, १ रोटाव्हेटर ३. वापरलेला वाण - राशी ३४९९ (मका) ४. बियाणे हेक्टरी - २० किलो ५. बीज प्रक्रिया- प्रति किलो बियाणास गाऊचो ३ मिली (कीटकनाशक), २५ ग्रॅम ट्रायकोडर्मा, अझोटोबँक्टर + PSB (जिवाणू संवर्धन), १०० ग्रॅम गूळ. ६. लागवड पध्दत - बैलाच्या सहाय्याने (६०X२० सें मी) २ फूट अंतरावर सरी पाडून मजुरांच्या सहाय्याने टोकणी करून मका पेरणी केली. ७. खतांचा वापर - हेक्टरी १७ ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत, २ टन गांढूळ खत, निंबोळी पेंड १५० किलो, झिंक सल्फेट २५ किलो प्रति हेक्टर, १०:२६:२६ - ६ पोती, युरिया - ८ पोती, १९: १९: १९ - १० किलो, १२: ६१: ० - १० किलो, १३: ४०: १३ - १०किलो - ६० दिवसांनी, ०: ०: ५० - ८ किलो, ०: ५२: ३४ इस्रायल खत दाणे भरणेच्या वेळी १० किलो. ८. कीड व रोग नियंत्रणाच्या उपायोजना - अमेरिकन लष्करी अळीसाठी ५ % निंबोळी अर्क, प्रोक्लेम १० ग्रॅम प्रति २० लिटर पपं प्रमाणे, BT - (२ मिली प्रति लि), हमला २ मिली प्रति लिटर, दशपर्णी अर्क (१० मिली प्रति लि), ९. साध्य केलेली उत्पादकता - ५९.५२ क्विंटल एकरी १०. उत्पादन वाढीकरिता केलेल्या विशेषउपायोजना/वापरलेले नाविन्यपुर्ण तंत्रज्ञान १. झिंक सल्फेट २ मिली प्रमाणे फवारणी केली. साधारणपणे १५ दिवसाच्या अंतराने अंडा अमिनो ऍसिड ५ मिली, फिश अमोनो ऍसिड २ मिली, पीक वाढीसाठी जैविक सूक्ष्मअन्नद्रव्य ५ मिली प्रति लिटर प्रमाणे फवारणी केली. २. जैवीक कीड नियंत्रणसाठी एकरी ९ कामगंध सापळे लावले. एकरी २५ पिवळे -निळे चिकट सापळे लावले. बुरशी नाशक व मेटारायझिअमचा वापर केला. ३. माती परीक्षण व पाणी परीक्षण करून शिफारशीनुसार समतोल खताचा वापर केला. व पाणी व्यवस्थापन केले. ४. कोळप्याच्या ३ पाळ्या दिल्या व मका बैलाच्या साहाय्याने बांधून घेतली. ५. पाणी व्यवस्थापन वेळेवर केले. ८ वेळा अवस्थेनुसार पीक उगवणीसाठी, पीक वाढीसाठी, फ्लॉवरिंगच्या अवस्थेत, दाणे भरण्याच्या अवस्थेत पाणी दिले. ६. मका उगवण होत असताना ८ दिवस नंतर भोरड्या पक्षी मुळे रोप नष्ट होऊ नयेत म्हणून विशेष करून काळजी घेतली व प्लॉटवर थांबून संरक्षण केले.
दादा तुम्हाला सांगतो मी महिको कंपनीचा मका आहे खरीप हंगामासाठी MRM 3845 याच उत्पादन 36 क्विंटल पर्यंत येत. आणि रब्बी ला MRM 4065 हा मका आहे याला चॅलेंज नाही दादा याच्या बाजूला कोणत्याही कंपनीचा मका लावा आणि मग मला सांगा कस येत जबरदस्त वाण आहे